फिश्त ऑलिंपिक मैदान
Jump to navigation
Jump to search
फिश्त ऑलिंपिक मैदान रशियाच्या सोत्शी शहरातील मैदान आहे. सोत्शी ऑलिंपिक पार्कमध्ये असलेले हे मैदान २०१४ हिवाळी ऑलिंपिकसाठी बांधले गेले. या स्पर्धेचे उद्घाटन आणि समाप्ती सोहळे येथे पार पडले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४०,००० आहे.
सुरुवातीस या मैदानाला छत होते. २०१६मध्ये हे छत काढून येथे फुटबॉल मैदान करण्यात आले. २०१७ फिफा कॉन्फेडरेशन चषक आणि २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामने येथे खेळले गेले.