फिलिपाईन समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिलिपाईन समुद्र हा पश्चिम प्रशांत महासागराचा भाग असलेला समुद्र आहे. हा समुद्र साधारण तैवान आणि फिलिपिन्स द्वीपसमूहाच्या पश्चिमेस, जपानच्या रायुकु बेटांच्या दक्षिणेस, मेरियाना बेटांच्या पूर्वेस आणि पालाउच्या उत्तरेस आहे. हा प्रदेश अंदाजे ५० लाख किमी विस्ताराचा आहे.

या समुद्रात चिनी, जपानी, पॉलिनेशियनांसह अनेक प्रदेशांचे खलाशी हजारो वर्षे सफरी करीत आले आहेत. फर्डिनांड मॅगेलन हा १९२१मध्ये या प्रदेशात पोहोचणारा पहिला युरोपीय होता. त्याने या समुद्रास मार फिलिपिनास असे नाव दिले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९-२० जून, १९४४ रोजी या समुद्राच्या पूर्व भागात दोस्त राष्ट्रेजपानी आरमारांच्या फिलिपाईन समुद्राची लढाई लढली गेली होती.