Jump to content

फायर (१९९६ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फायर
दिग्दर्शन दीपा मेहता
निर्मिती दीपा मेहता
कथा दीपा मेहता
प्रमुख कलाकार नंदिता दास
शबाना आझमी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
कॅनडा
भाषा [[हिंदी
इंग्लिश भाषा|हिंदी
इंग्लिश]]
प्रदर्शित ६ सप्टेंबर १९९६
अवधी १०८ मिनिटेफायर हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक चित्रपट आहे. दीपा मेहताने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शबाना आझमीनंदिता दास ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाद्वारे समलैंगिकता हा वादग्रस्त विषय भारतीय सिनेमामध्ये प्रथमच हाताळला गेला. त्यामुळे ह्या चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. २ डिसेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये शिवसेनेने ह्या चित्रपटाविरुद्ध आंदोलन सुरू करून तोडफोड केली. इतर काही शहरांमध्ये देखील हे प्रकार घडले. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी ह्यांनी शिवसेनेच्या कृत्याचे समर्थन करीत भारतीय संस्कृतीमध्ये अशा चित्रपटाला जागा नसल्याचे विधान केले. ह्या घटनांमुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा करून दीपा मेहता, महेश भट्ट, दिलीप कुमार इत्यादींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १२ फेब्रुवारी १९९९ रोजी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला गेला.

दीपा मेहताने नंतर ह्यासारखे सामाजिक विषय हाताळणारे अर्थ (१९९८) व वॉटर (२००५) हे दोन चित्रपट काढले.

बाह्य दुवे

[संपादन]