फाग उत्सव


फाग उत्सव हा उत्तर भारतातील होळी या सणाशी संबंधित धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे .[१]
स्वरूप
[संपादन]वसंत पंचमीपासून पुढे चाळीस दिवस बरसाणा येथील राधा मंदिरात वृंदावन येथील आणि कृष्णाच्या मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो . या निमित्ताने राधारानीच्या चरणांवर दररोज गुलाल अर्पण केला जातो . कृष्णाच्या मूर्तीला दररोज फेटा बांधला जातो .[२] ग्रीष्म ऋतूची सुरुवात असल्याने या कालावधीत कृष्ण मंदिरात उष्मांक असलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करणे थांबविले जाते .देवाचे लोकरीचे वस्त्र बदलून त्याला साधा सुती पोशाख चढविला जातो .[३] साधू आणि बैरागी राधा आणि कृष्णाच्या मंदिरात गुलालाने रंग खेळतात .
- श्रीकृष्णाला आमंत्रण-
होळीच्या आधी आठ दिवस म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथीला बारासाना येथील युवती नंदगाव येथील कृष्ण मंदिरात फाग उत्सवासाठी निमंत्रण पाठवितात अशी पद्धती प्रचलित आहे .[४] विविध रंगांनी खेळून होळी साजरी करणे आणि त्याचा आनंद घेणे असे स्थानिक भाविक लोक करतात.
- गायन सेवा -
होळी उत्सवाच्या या चाळीस दिवसांच्या काळात राधा आणि कृष्णाच्या मंदिरात दरररोज गायन केले जाते ज्यामध्ये पारंपरिक होळी गीते सादर केली जातात. यालाच समाज गायन सेवा असेही म्हटले जाते . या दरम्यान साधू व बैरागी लोक एकमेकांना गुलाल लावतात अशी पद्धती आहे .[५]
उज्जैन मंदिरातील उत्सव
[संपादन]उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराला या काळात तीन वेळा गुलाल अर्पण करण्याची पद्धती प्रचलित आहे .[६]
हिमाचल प्रदेशातील उत्सव
[संपादन]
हिमाचल प्रदेशात चार दिवसीय फाग महोत्सव साजरा केला जातो . या काळात स्थानिक देवतांची गावागावातून मिरवणूक काढली जाते आणि हे या उत्सवाचे आकर्षण मानले जाते .वाहतूक आणि दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसताना या उत्सवाची सुरुवात झाली असावी असे मानले जाते . थंडी संपून बर्फ वितळू लागल्यावर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी स्थानिक सदस्य हा उत्सव साजरा करतात . सिमला आणि कुलू दरी प्रदेशातील २ ६ देवतांना आमंत्रण दिले जाते .या देवतांचे स्वागत रामपूर येथे करण्याची पद्धती प्रचलित आहे .[७]
महाराष्ट्र राज्यातील उत्सव
[संपादन]फाग उत्सवाचे आयोजन महाराष्ट्र राज्यातील पैठण येथील नाथ मंदिरात केले जाते. होळी उत्सवाचे वर्णन करणारी मराठी , हिंदी , व्रज या भाषेतील लोकगीतांचे गायन केले जाते . मंदिरातील कृष्ण मूर्तीवर फुले व गुलाल उधळून जल्लोष केला जातो .[८]
संदर्भ
[संपादन]- ^ GROUP, SSGCP (2024-03-07). Uttar Pradesh At a Glances 2024 (इंग्रजी भाषेत). Sam Samyik Ghatna Chakra.
- ^ "मथुरा में 40 दिवसीय फाग महोत्सव की धूम, आज से उड़ेगा अबीर-गुलाल". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2025-02-03. 2025-03-05 रोजी पाहिले.
- ^ "मथुरा में बांके बिहारी को लगाया गया गुलाल, बसंत पंचमी से फागुन तक ब्रज में उड़ेगा अबीर गुलाल". Zee News Hindi (हिंदी भाषेत). 2025-03-05 रोजी पाहिले.
- ^ Service, Statesman News (2023-03-08). "Holi in Braj, "The land of Lord Krishna," comes in a variety". The Statesman (इंग्रजी भाषेत). 2025-03-06 रोजी पाहिले.
- ^ "40 दिवसीय फाग महोत्सव शुरू, बसंत पंचमी पर बांके बिहारी मंदिर में आज उड़ेगा गुलाल". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2025-03-06 रोजी पाहिले.
- ^ Bharatvarsh, TV9 (2025-02-04). "बाबा महाकाल को लगाया गया गुलाल, शुरू हुआ 40 दिन का फाग महोत्व; भक्त खेलेंगे होली". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2025-03-05 रोजी पाहिले.
- ^ "Faag Utsav: Deities bless royal throne in Rampur". The Tribune (इंग्रजी भाषेत). 2025-03-06 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2023-03-08). "इंदूरचा गुलाब अन् राजस्थानच्या गुलालाची उधळण; धुलीवंदनानिमित्त नाथ मंदिरात फाग उत्सव". Lokmat. 2025-03-06 रोजी पाहिले.