प्रोपेन
| उपवर्ग | biogenic aliphatic hydrocarbon, alkane |
|---|---|
| वापर | refrigerant, इंधन |
| Associated hazard | propane exposure |
| प्रभाव असतो | propane exposure |
| रासायनिक सूत्र | C₃H₈ |
| Canonical SMILES | CCC |
| Safety classification and labelling | NFPA 704: Standard System for the Identification of the Hazards of Materials for Emergency Response |
| NIOSH Pocket Guide ID | 0524 |
| Found in taxon | Calendula officinalis |
| Has characteristic | flammable object |
| Complies with | A3 |
प्रोपेन (/ˈproʊpeɪn/) हा तीन‑कार्बन साखळी असलेला एक अल्केन असून त्याचे रासायनिक सूत्र C3H8 असे आहे. प्रमाणित तापमान व दाबाखाली तो वायुरूपात असतो. वाहतूक व साठवणुकीसाठी याला उच्च दाबाखाली तो द्रवरूपात रुपांतरित केले जाते. प्रोपेन नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या शुद्धीकरणा दरम्यान वेगळा केला जातो. तो प्रामुख्याने द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) चा घटक असतो. एलपीजी घरगुती व औद्योगिक इंधन म्हणून तसेच लघु‑उत्सर्जन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
प्रोपेनचा शोध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ मार्सेलिन बेर्थेलो यांनी इ.स. १८५७ मध्ये लावला. १९११ च्या सुमारास हे इंधन म्हणून अमेरिकेत व्यावसायिकरीत्या उपलब्ध झाला. प्रोपेनची आयतनाधारित ऊर्जा घनता पेट्रोल किंवा कोळशापेक्षा कमी असली, तरी वस्तुमानाधारित ऊर्जा घनता त्यांच्यापेक्षा जास्त आहे. प्रोपेन तुलनेने स्वच्छ जळतो व जळताना कमी प्रमाणात कार्बन डायॉक्साइड आणि इतर प्रदूषके तयार होतात.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Fuels". www.globalfueleconomy.org. २०२२-०४-१२ रोजी पाहिले.[permanent dead link]