प्रेरणा संतुलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

मानसशास्त्राच्या आधारे काव्यानंदाची उत्पत्ती सांगण्याचा प्रयत्न आय. ए. रिचर्ड या सौंदर्यशास्त्रज्ञाने केला आहे. कलाकृतीच्या आस्वादाने मानवी मनाची जी समाधात अवस्था होते तिला रिचर्ड कलानंद असे संबोधतो. अनेकविध प्रेरणांच्या अंतर्विरोधाचा परिहार करून त्यांचा समतोल साधण्याने मनाची ही समाधात अवस्था निर्माण होते असे रिचर्ड म्हणतो. या संदर्भात त्याने मांडलेला सिद्धांत प्रेरणा संतुलन सिद्धांत किंवा समाधातता सिद्धांत म्हणून ओळखला जातो. चिनी तत्त्ववेत्ता कन्फ्युशिअस याच्या विचारसरणीचा प्रभाव रिचर्डच्या कलासिद्धांतावर पडलेला आहे.