Jump to content

प्रीती दास गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रीती दास गुप्ता - चित्रकार, लेखिका

जीवन

[संपादन]

प्रीती दास गुप्ता या एप्रिल १९४४ मध्ये आई बिभावती (व्हायोलेट-दी) आणि धाकटा भाऊ मनोज दास गुप्ता यांच्या समवेत श्रीअरविंद आश्रमात कायमच्या वास्तव्यास आल्या.[] कालांतराने त्यांचे वडील नरेंद्रनाथ दास गुप्ता सुद्धा आश्रमवासी झाले. क्रांतिकारक चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. या कार्यात जतीन्द्रनाथ मुखर्जी हे त्यांचे मार्गदर्शक होते. नरेंद्रनाथ दास व काही सहकारी यांनी मिळून आर्य पब्लिशिंग हाउसची स्थापना केली. श्रीअरविंद यांचा द लाईफ डिव्हाईन हा ग्रंथ प्रथम या हाउसतर्फे प्रकाशित झाला.[] पुढे नरेंद्रनाथ दास फेनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून अध्यापन करू लागले. आश्रमात राहायला लागल्यानंतर ते आश्रमाच्या छापखान्यात काम करू लागले. [] प्रीती आणि त्यांची बहिण तपती दास गुप्ता या दोघी आश्रमाच्या छापखान्यात काम करत असत. []

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • अबिस्मरणीय मुहूर्त (ओरिया) - प्रकाशक - श्री मीरा ट्रस्ट, आय.एस.बी.एन: 978-81-86413-45-6
  • अविस्मरणीय स्मृतिओ (गुजराथी) - प्रकाशक - श्रीअरविंद केंद्र, वीसनगर
  • मोमेंट्स इटर्नल (२००९) [] (मूळ पुस्तक बंगालीमध्ये आहे.) - इंग्रजी अनुवाद मौरिस शुक्ला यांनी केला आहे. श्री मीरा ट्रस्ट, पाँडिचेरी यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आलेला आहे. आय.एस.बी.एन: 978-81-86413-53-1 []

पुस्तके वाचनासाठी उपलब्ध

[संपादन]

चित्रे

[संपादन]

प्रीती यांची चित्रे[permanent dead link]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Priti Dasgupta. Moments Eternal". aurobindoru.auromaa.org. 2025-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Personalia / Priti Das Gupta". aurobindoru.auromaa.org. 2025-03-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Suprabha Nahar: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2020-10-23. 2025-03-03 रोजी पाहिले.
  4. ^ "Disciples, followers and exegetes. Works in English". aurobindoru.auromaa.org. 2025-03-03 रोजी पाहिले.