प्रीतिलता वड्डेदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रीतिलता वड्डेदार 
भारतीय महिला स्वातंत्र्यवीर
Original Archived photo of Pritilata Waddedar.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावপ্রীতিলতা ওয়াদ্দেদার
जन्म तारीखमे ५, इ.स. १९११
चट्टग्राम
मृत्यू तारीखसप्टेंबर २३, इ.स. १९३२
चट्टग्राम
मृत्युची पद्धत
मृत्युचे कारण
  • cyanide poisoning
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • शिक्षक
  • revolutionary
चळवळ
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Pritilata Waddedar (es); প্রীতিলতা ওয়াদ্দেদার (bn); Pritilata Waddedar (fr); પ્રીતીલતા વાડ્ડેદાર (gu); Pritilata Waddedar (ast); Притилата Ваддедар (ru); प्रीतिलता वड्डेदार (mr); Pritilata Waddedar (de); Պրիտիլատա Վադդեդար (hy); פריטילאטה ואדדאר (he); Pritilata Waddedar (nl); प्रीतलता वादेदार (sa); प्रीतिलता वादेदार (hi); ᱯᱨᱤᱛᱤᱞᱚᱛᱟ ᱣᱟᱫ-ᱫᱮᱫᱟᱨ (sat); ਪ੍ਰੀਤੀਲਤਾ ਵਾਦੇਦਾਰ (pa); Pritilata Waddedar (en); പ്രീതിലത വാദേദാർ (ml); Pritilata Waddedar (br); பிரிட்டிலடா வதேதர் (ta) বাঙালি স্বাধীনতা যোদ্ধা (bn); indische Freiheitskämpferin (de); Activiste pour l'indépendance de l'Inde (fr); Indian woman freedom fighter (en); भारतीय महिला स्वातंत्र्यवीर (mr); भारतीय महिला स्वतंत्रता सेनानी (hi); onderwijzeres uit Brits-Indië (1911-1932) (nl) Rani (en); রানী (bn); रानी (hi)
प्रीतिलता वड्डेदार

प्रीतिलता वड्डेदार (५ मे, १९११२३ सप्टेंबर, १९३२) या एक भारतीय महिला क्रांतिकारक होत्या. त्यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातील चित्तगांव जवळील ढोलघाट या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जगबंधू वड्डेदार व आईंचे नाव प्रतिभा वड्डेदार होते.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

पुराणातील दुर्गा, इतिहासातील जिजाबाई, राणी पद्मिनी, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई इत्यादी वीरांगनांच्या गोष्टी एेकून प्रीतिलता प्रेरित झाल्या होत्या. त्यांच्या मनात आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी भावना लहानपणापासूनच निर्माण झाली होती.

इ.स. १९२७ मध्ये त्या विषेश प्रावीण्य प्राप्त करून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी कलकत्त्याला काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. काॅलेजमध्ये असतानाच त्यांनी कल्पना दत्त, कमला मुखर्जी, रेणू रे या मैत्रिणींसह हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी चे सदस्यत्व स्वीकारले. इ.स. १९३० साली त्या बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

क्रांतिकार्य[संपादन]

ढोलघाटला परत आल्यावर प्रीतिलतांनी 'नंदनकानन' शाळेची मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारला. पुढे हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमधील त्यांचे सहकारी सूर्यसेन यांनी त्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या क्लबवर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली. ४ सप्टेंबर १९३२ ला रात्री ९.३० वाजता प्रीतिलता आणि इतर सात सहकाऱ्यांनी पहाडतळी रेल्वे स्टेशनजवळील क्लबमध्ये एकत्रित झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी १५ अधिकाऱ्यांना यमसदनी पाठविले आणि त्या क्लबच्या इमारतीवर बॅाम्ब टाकून तेथील शस्त्रसाठा उद्ध्वस्त केला. स्वीकारलेले कार्य पूर्णत्वास नेणाऱ्या पुरुषी वेशातील प्रीतिलताने त्यानंतर स्वतः सायनाईड प्राशन करून आत्मबलिदान केले.