Jump to content

प्रियदर्शिनी इंदलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रियदर्शिनी इंदलकर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावप्रिया संपादन
जन्म तारीख१९ जून 1997 संपादन
जन्मस्थानसांगली संपादन
व्यवसायदूरदर्शन अभिनेता, अभिनेता संपादन

प्रियदर्शिनी इंदलकर (जून १९, १९९७ - हयात) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. खास करून मराठी भाषेतील चित्रपट आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी मालिके मधील भूमिकांसाठी ती ओळखली जाते. तिने फुलराणी, सोयरिक आणि नवरदेव बीएससी. ॲग्री यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फुलराणी आणि नवरदेव बीएससी. ॲग्री मधील तिच्या अभिनयासाठी तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकन मिळाले. तसेच फुलराणी चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण - मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

इंदलकरचा जन्म सांगली येथे झाला आणि ती पुण्यात लहानाची मोठी झाली.[] तिने रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर तिने पुण्यातील पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून बीई (आयटी) पदवी पूर्ण केली.[][]

कारकिर्द

[संपादन]

इंदलकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ईटीव्ही मराठीवरील मुलांच्या कार्यक्रम अफलाटून लिटिल मास्टर्समध्ये सादरीकरणाने केली.[][]

२०१८ मध्ये इंदलकर तिच्या कामासाठी मुंबईला गेली आणि नंतरच्या 'हास्यजत्रा' मधील सहकलाकार वनिता खरातशी तिची मैत्री झाली.[] तिने मौनांतर या नाटकातून तिच्या मराठी नाट्य कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर 'खामोशी' आणि 'पराणा' मध्ये काम केले. तिने काही डबिंगचे काम देखील केले आहे. इंदलकरने सोनी मराठी टीव्ही शो 'अस्सं माहेर नको ग बाई' मध्ये भूमिका केल्या.[]

तिला मोठा ब्रेक तेव्हा मिळाला जेव्हा ती महाराष्ट्राची हास्यजत्रा स्केच-कॉमेडी शोमध्ये नियमित कलाकार बनली.[][][]

२०२१ मध्ये, तिने 'फोटोप्रेम' या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका केली. नंतर, तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि फुलराणी,[] सोयरिक आणि नवरदेव बीएससी. आगरी मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.

इंदलकर ने हिंदी आणि मराठी वेब सिरीजमध्ये काम केले आहे, शांतीत क्रांती आणि फर्जी मध्ये तिने भूमिका केल्या आहेत.[]

चित्रपटांची यादी

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोंद संदर्भ
२०२१ फोटोप्रेम छोटी भूमिका
२०२२ सोयरीक
भाऊबळी चिन्मयी आवळसकर सहाय्यक भूमिका
२०२३ फुलराणी शेवंता तांडेल (फुलराणी) हा चित्रपट १९६४ मधील अमेरिकन चित्रपट 'माय फेअर लेडी' चा रिमेक आहे. [१०]
२०२४ नवरदेव बीएससी ॲग्री सुकन्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकित (सिटी सिने अवॉर्ड्स मराठी २०२४)[११]
रुखवत महिमा
२०२५ चिकीचिकी बुबूमबूम स्विटी
संसार भानवी
गाडी नंबर १७६० चिनू
दशावतार वंदना सोमण

मालिका

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
२०१० अफलातून लिटिल मास्टर्स स्पर्धक [१२]
२०२०-२०२१ अस्सं माहेर नको गं बाई! सुनैना
२०२२-आतापर्यंत महाराष्ट्राची हास्यजत्रा स्पर्धक वेगवेगळ्या भूमिका
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
२०२३ शांतीत क्रांती समृद्धी []
फर्जी ईश्वरी पाटील

नाटके

[संपादन]
  • मौनांतर
  • खामोशी
  • पराना

पुरस्कार

[संपादन]

इंदलकर यांना खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले:

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "चुकीच्या गोष्टी करण्याची आवश्यकता नसते, गुणवत्तेच्या जोरावर कामे मिळतात - अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर". लोकसत्ता. 16 March 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  2. 1 2 "'हास्यजत्रे'चा अमेरिका दौरा झाल्यावर माझे डोळे उघडले...असं का म्हणाली प्रियदर्शनी इंदलकर?". महाराष्ट्र टाइम्स. 29 March 2024. 2024-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 June 2024 रोजी पाहिले.
  3. "Video: गुरंढोरं,शेतीवाडी अन् प्रशस्त घर! पहा प्रियदर्शनी इंदलकरची गावची संपत्ती". लोकमत. 3 July 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  4. 1 2 "'अफलातून लिटील मास्टर्स'चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला?". लोकमत. 25 March 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  5. "महिला दिनानिमित्त मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा खास उपक्रम, 'फुलराणी'नं शेअर केला स्पेशल किस्सा". एबीपी माझा. 8 March 2024. 26 June 2024 रोजी पाहिले.
  6. "मुंबईत राहण्यासाठी जेव्हा घर नव्हतं तेव्हा वनिता खरातने.. प्रियदर्शिनीने सांगितली खास आठवण." सकाळ. 22 March 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  7. "'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात तुझी निवड कशी झाली? प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली "सुरुवातीला कठीण..."". लोकसत्ता. 11 October 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  8. ""महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सुरुवातीला दिग्दर्शकांनी मला नकार दिला होता कारण..." प्रियदर्शनीने केला खुलासा". लोकसत्ता. 18 March 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  9. 1 2 "'समृद्ध' करणारी भूमिका – प्रियदर्शिनी इंदलकर". सामना. 11 October 2023. 2024-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 June 2024 रोजी पाहिले.
  10. "हास्यजत्रेची राणी झाली सुबोधची फुलराणी, अखेर समोर आला तिचा चेहरा". Navarashtra. 2023-02-13. 2023-03-06 रोजी पाहिले.
  11. "Marathi Cinema's Finest Honored: City Cine Awards Marathi 2024 Results". Radiocity. 2025-02-07 रोजी पाहिले.
  12. "'अफलातून लिटील मास्टर्स'चा १५ वर्षांपूर्वीचा Video व्हायरल, ओळखलंत का या चिमुकलीला?". लोकमत. 2023-03-25.
  13. "प्रियदर्शनी इंदलकरला शरद पोंक्षेंच्या हस्ते मिळाला महत्त्वाचा पुरस्कार, म्हणाली "अशी प्रोत्साहनाची थाप…"". लोकसत्ता. 7 November 2023. 26 June 2024 रोजी पाहिले.
  14. ""विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण". लोकमत. 19 April 2024. 26 June 2024 रोजी पाहिले.
  15. ""हास्यजत्रेशिवाय हे शक्य नव्हतं…", प्रियदर्शनी इंदलकरचा सर्वात्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारने गौरव, पोस्ट करत म्हणाली…". लोकसत्ता. 8 June 2024. 26 June 2024 रोजी पाहिले.
  16. "महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचा आणखी एका पुरस्काराने सन्मान". दैनिक प्रभात. 8 June 2024. 26 June 2024 रोजी पाहिले.
  17. "गौरी देशपांडे, प्रियदर्शनी इंदलकर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चेहरा;संतोष जुवेकर सर्वोत्कृष्ट खलनायक". सकाळ. 7 June 2024. 26 June 2024 रोजी पाहिले.