प्रियंवदा सिंग
fort restorer in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | c. इ.स. १९८३ अजमेर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
प्रियंवदा सिंग (जन्म: सुमारे १९८३) ह्या एक मीडिया व्यावसायिक आणि सांस्कृतिक वारसा जीर्णोद्धार करणाऱ्या भारतीय महिला आहेत. मुंबईत टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक दशक काम केल्यानंतर, ती राजस्थानमधील तिच्या वडिलोपार्जित घरी परतली आणि स्थानिक समुदायाच्या कौशल्याचा वापर करून भिलवाडा जवळील तिच्या मेजा गावात एक वडिलोपार्जित किल्ला पुनर्संचयित केला. स्थानिक समुदायाच्या पुनर्संचयित आणि सामाजिक उन्नतीच्या प्रयत्नांसाठी स्थानिक कौशल्यांचा वापर केल्यामुळे तिला भारत सरकारकडून नारी शक्ती पुरस्कार मिळाला.

प्रारंभिक आयुष्य
[संपादन]तिचा जन्म सन १९८३ मध्ये अजमेर, राजस्थान येथे झाला. तिने अजमेरमधील मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल आणि सोफिया वुमेन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[१]
तिचे वडील जितेंद्र सिंग हे निवृत्त शासकीय अधिकारी तर आई रम्मा कुमारी ह्या गृहिणी आहेत. २०१४ मध्ये विजयेंद्र चंद्र देब यांच्याशी लग्न केले.[१]
कारकीर्द
[संपादन]तिने नवी दिल्ली येथे चित्रपट निर्माते मुझफ्फर अली यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मीडियामध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. इंडो-फ्रेंच ऑपेरा, आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव मालिका जहां-ए-खुसरो आणि साउथबँक सेंटर लंडन येथे सांस्कृतिक महोत्सव अशा अनेक प्रकल्पांवर तिने काम केले. त्यानंतर डीडीएनई, डीडी काशीर, आयसीसीआर, यूएनओडीसी इत्यादींसह काही फ्रीलांस क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स करण्यात आले. नंतर तिने मुंबईतील टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कौन बनेगा करोडपती, दस का दम आणि इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोसाठी कंटेंट डेव्हलपर म्हणून काम केले. [२]
जीर्णोद्धार
[संपादन]तथापि, जेव्हा तिने कुटुंबाचे वडिलोपार्जित घर, जे की एका ६० खोल्यांचा किल्ला होता, त्याचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. हा किल्ला बांधल्यापासून, म्हणजे १४६ वर्षांपासून दुरुस्त करण्यात आला नव्हता. मेवाडच्या महाराणा कडून १८७१ मध्ये ही जागीर मिळाल्यानंतर, १८७५ च्या सुमारास त्यांचे पूर्वज रावत अमर सिंहजी यांनी हा, 'मेजा किल्ला' बांधला.
ती किल्ल्यात गेली आणि जीर्णोद्धार प्रक्रियेत स्थानिक लोकांना, त्यातल्या त्यात विशेषतः महिलांना स्वतःचे उत्पन्न मिळवून फायदा होईल याची तिने काळजी घेतली. सुमारे ५०,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या संरचनेचा जीर्णोद्धार करण्यासाठी तिने कोरड्या दगडी बांधकाम, चुन्याचे प्लास्टर इत्यादी पारंपारिक बांधकाम तंत्रांचा वापर केला. मेजा धरण जवळच आहे.[२]
जीर्णोद्धारीत किल्ला एका "ब्लाउज" नावाच्या लघुपटासाठी वापरला गेला. या चित्रपटात जीर्णोद्धार केलेले काम दाखवले गेले. या चित्रपटात निर्मातेविजयिता कुमार यांनी स्थानिक लोकांना अतिरिक्त कलाकार म्हणून काम दिले. ज्यामुळे या लोकांना रोजगार आणि प्रसिद्धी असे दोन्ही मिळाले. हा चित्रपट पीव्हीआर सिनेमाजने प्रदर्शित केला. या चित्रपटाला २०१४-१५ मध्ये न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. सिंगने एका स्थानिक मुलाच्या गायन प्रतिभे कडे पाहून त्याला मुंबईत स्थायिक होण्यास मदत केली. या किल्ल्याचा वापर "गणगौर", "जल झूलनी एकादशी" इत्यादी स्थानिक उत्सवांसाठी केला जातो. याच सोबत रक्तदान आणि योग शिबिरे यांसारख्या सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी देखील याचा वापर केला जातो. किल्ल्यावर स्थानिकांसाठी एक सार्वजनिक ग्रंथालय देखील आहे. विशिष्ट परिस्थितीत हा किल्ला पर्यटकांसाठी निवासस्थान म्हणून देखील वापरला जाऊ शकतो.[१]
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- फेब्रुवारी २०१८ मध्ये, सिंग यांना आयसीआयसीआय बँकेन "दि ॲडव्हांटेज वुमन ॲवार्ड" हा पुरस्कार दिला. या पुरस्कारासाठी भारतातील २५ प्रेरणादायी महिलांमधून त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या जीर्णोद्धाराच्या कार्यासाठी आणि प्रकल्पाच्या सामाजिक परिणामासाठी अभिनेत्री विद्या बालनने मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान केला.[२]
- ऑगस्ट २०१८ मध्ये, मेहरानगड संग्रहालय ट्रस्ट आणि वीर दुर्गा दास स्मृती समिती जोधपूर यांनी वारसा पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्याच्या सामाजिक परिणामासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी सिंग यांना पुरस्कार दिला. सदरील संस्था जोधपूरच्या महाराज गज सिंह जी यांच्या नेतृत्वाखाली काम करते.
- ८ मार्च २०१९ रोजी, सिंग यांना सदरील कार्यासाठी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या शिफारशीवरून भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंग आणि इतर सर्व पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d Kapoor, Aekta (2018-03-03). "She Quit Showbiz to Live in an Old Fort for a Curious Reason". eShe (इंग्रजी भाषेत). 2020-05-15 रोजी पाहिले.
- ^ a b c "From showbiz to ancestral fort, a Meja-stic heritage mission for this Rajasthan woman". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-03-25. 2020-05-14 रोजी पाहिले.