प्रादेशिक रेल्वे
प्रादेशिक रेल्वे ही शहरे आणि जवळपासच्या लहान मोठ्या गावा आणि शहरांदरम्यान चालणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सेवा आहे. या सेवेत आंतरनगरी रेल्वेपेक्षा जास्त थांबे असतात आणि या गाड्या उपनगरी रेल्वेपेक्षा वेगळ्या असतात कारण या शहरी भागांच्या मर्यादेबाहेर जाऊन लहान शहरे आणि गावांपर्यंत देखील सेवा देतात.
वैशिष्ट्ये
[संपादन]प्रादेशिक रेल्वे अशा सेवा प्रदान करते ज्या वस्त्यांना एकमेकांशी जोडतात. हे उपनगरी रेल्वे सेवेपेक्षा वेगळे आहे कारण उपनगरी रेल्वे एकाच शहरी क्षेत्रातील विविध ठिकाणांना जोडते. आंतरनगरी सेवांपेक्षा प्रादेशिक रेल्वे गाड्या अधिक स्थानकांवर थांबतात आणि लहान वसाहतनां देखील सेवा देतात. या गाड्या बरेचदा आंतरनागरी सेवांचेच मार्ग वापरून , अश्या साहित्य वसाहतींना पण सेवा देतात जिथे आंतरनगरी गाड्या थांबत नाहीत किंवा थांबू शकत नाहीत. काही मार्गांवर आंतरनागरी सेवेचे समर्थन करण्यासाठी पुरेशी वर्दळ नसलेल्या अशा मार्गांवर फक्त प्रादेशिक रेल्वे सेवा देतात.
आंतरनगरी रेल्वे सेवांपेक्षा प्रादेशिक रेल्वे सेवा फायदेशीर असण्याची शक्यता खूपच कमी असते, त्यामुळे त्यांना अनेकदा सरकारी निधीची आवश्यकता असते. याचे मुख्य कारण म्हणजे बरेच प्रवासी मासिक पास वापरतात ज्यामुळे प्रत्येक प्रवासाची किंमत कमी होते आणि कमी सरासरी वेगामुळे कमी अंतर धावत येते, म्हणजेच प्रति तास प्रचालनाचे तिकिटांचे उत्पन्न कमी मिळते. सामाजिक किंवा पर्यावरणीय कारणास्तव आणि प्रादेशिक रेल्वे सेवा बहुतेकदा अधिक फायदेशीर आंतरनगरी मार्गांसाठी पूरक सेवा म्हणून काम करतात म्हणून देखील अशा सेवांवर अनुदाने न्याय्य असतात.
प्रादेशिक आणि आंतरनगरी मध्ये अशा सेवा देखील आहेत ज्यात ज्यामध्ये प्रादेशिक रेल्वे सेवेसारखे थांबे आणि प्रवाशांना आकर्षित करायला पासचे कमी दर असतात. उदा : ओरेसुंडट्रेन ( कोपनहेगन आणि येथून ३ तासांपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या स्वीडनमधील तीन शहरांदरम्यान सेवा)