Jump to content

प्राचीन ग्रीक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राचीन ग्रीक भाषा
पार्थेनोनमधील अथीना पार्थेनोसच्या बांधकामाचे वृत्तांत, इ. स. पू. ४४०/४३९
प्रदेश पूर्व भूमध्य आणि ग्रेको-रोमी जग
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
  • प्राचीन ग्रीक भाषा
भाषा संकेत
ISO ६३९-१ grc
ISO ६३९-२ grc
भाषिक प्रदेशांचा नकाशा
हेलेनी काळातील (इ.स.पू. ३२३ ते ३१) ग्रीक-भाषिक प्रदेश.
  प्रदेश जिथे ग्रीक भाषिक बहुधा बहुमत असायचे
  प्रदेश जे सार्थपणे हेलेनीकृत झाले होते
होमरच्या ओदुसेयाची सुरुवात

प्राचीन ग्रीक (Ἑλληνική, हेल्लेनीके)[] मध्ये इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. ३०० च्या सुमारास प्राचीन ग्रीस आणि प्राचीन जगात वापरल्या जाणाऱ्या ग्रीक भाषेच्या रूप येतात. याचे साधारणपणे खालील कालखंडांमध्ये विभाजन केले जाते: मिकीनी ग्रीक ( c. १४०० – सी. इ.स.पू. १२०० ), ग्रीक अंधारयुग ( c. १२०० – सी. इ.स.पू. ८०० ), पुरातन किंवा होमरी काळ ( c. ८०० – सी. इ.स.पू. ५०० ), आणि शास्त्रीय काळ ( c. ५०० – सी. इ.स.पू. ३०० ). []

प्राचीन ग्रीक ही होमरची आणि ५व्या शतकातील अथेनी इतिहासकार, नाटककार आणि तत्त्वज्ञांची भाषा होती. ही भाषा प्रबोधनकाळापासून पाश्चात्य जगातील शैक्षणिक संस्थांमध्ये ती अभ्यासाचा एक प्रमाणित विषय राहिली आहे. या लेखात प्रामुख्याने भाषेच्या महाकाव्य आणि अभिजात कालखंडांविषयी माहिती आहे, जे सर्वोत्तम पुरावे असलेले आणि प्राचीन ग्रीक भाषेचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण कालखंड मानले जातात. जेव्हा सिकंदरनी पंजाबमध्ये आक्रमण केले आणि राजा पुरुविरुद्ध लडले, या भाषेतील अनेक शब्द संस्कृतमध्ये आले, आणि त्या परिणामी मराठीतही आले. उदा. 'केंद्र', जे येते ग्रीकच्या 'κέντρον' (केन्त्रोन) पासून.

हेलेनी काळापासून( c. इ.स.पू. ३०० ) पुढे, प्राचीन ग्रीकानंतर कोइने ग्रीक आली, जीला एक वेगळा ऐतिहासिक टप्पा मानले जाते, जरी तिचे सर्वात जुने स्वरूप अतिकी ग्रीकशी मिळतेजुळते आहे आणि तिचे सर्वात नवीन रूप मध्ययुगीन ग्रीकच्या जवळ आहे, आणि कोइनेला व्यापक अर्थाने प्राचीन ग्रीक म्हणूनही वर्गीकृत केले जाऊ शकते – कारण ते ग्रीकचे मध्ययुगीन नव्हे तर प्राचीन स्वरूप आहे, जरी शतकानुशतके ते मध्ययुगीन आणि आधुनिक ग्रीकसारखे अधिकाधिक दिसू लागते.

प्राचीन ग्रीक भाषेत अतिकी, यवनी, दोरिसी, आयोली आणि आर्कादी-किप्री यांसारख्या अनेक बोलीभाषा होता. त्यांपैकी, अतिकी ही कोइने ग्रीकचा आधार बनली. ज्याच्याप्रमाणे कोइनेचा अनेकदा प्राचीन ग्रीकखाली मानल्या जातो, त्याचप्रमाणे याउलट, मिकीनी ग्रीकला सहसा स्वतंत्रपणे हाताळले जाते आणि तिचा नेहमीच प्राचीन ग्रीकमध्ये मानले जात नाही – यावरून हे दिसते की इ. स. पू, पहिल्या सहस्रकातील ग्रीक भाषा ही प्राचीन ग्रीकचे नमुनेदार मानली जाते.

बोलीभाषा

[संपादन]

प्राचीन ग्रीक ही बहुकेंद्रीय भाषा होती, जी अनेक बोलीभाषांमध्ये विभाजित होती. जे मुख्य बोलीभाषांचे समूह आहेत ते अतिकी, यवनी, आयोली, आर्कादी-किप्री आणि दोरिसीआहेत, ज्यांच्यातील बहु भाषांना अनेक विभाग आहेत. काही बोलीभाषा साहित्यामधील प्रामाणिक साहित्यिक प्रकारे आढळतात, आणि काही फक्त शिलालेखांमध्ये प्रमाणित असतात.

याचे अनेक ऐतिहासिक प्रकार पण आहेत. होमरी ग्रीक हे पुरातन ग्रीकचे (मुख्यतः यवनी आणि आयोलीमधून व्युत्पन्नलेले) एक साहित्यिक रूप आहे जे इलीयास आणि ओदुसेया या महाकाव्यांमध्ये आणि इतर लेखकांच्या नंतरच्या कवितांमध्येही वापरले गेले. [] होमरी ग्रीकचे व्याकरण आणि उच्चारण हे शास्त्रीय अतिकी आणि इतर शास्त्रीय युगाच्या बोलीभाषांपेक्षा लक्षणीय भिन्न होते.

इतिहास

[संपादन]

त्या काळातील पुराव्यांच्या अभावामुळे हेलनी भाषाकुळाचा उगम, प्रारंभिक स्वरूप आणि विकास नीटप्रकारे समजलेला नाही आहे. साध्या आद्य-हिंद-युरोपीय भाषेपासून सुरुवातीच्या ग्रीक-सदृश बोलीभाषा वेगळे झाल्यापासून ते शास्त्रीय काळापर्यंत कोणते हेलनी बोली गट अस्तित्वात होते, याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. त्यांची सर्वसाधारण रूपरेषा सारखीच आहे, परंतु काही तपशिलांमध्ये ते वेगळे आहेत. या काळातील एकमेव प्रमाणित बोली [a] मिकीनी ग्रीक आहे, परंतु ऐतिहासिक बोलींशी असलेले तिचे नाते आणि त्या काळातील ऐतिहासिक परिस्थिती असे सूचित करतात की एकूण गट आधीपासूनच कोणत्यातरी स्वरूपात होते.

विद्वानांच्या मते, प्राचीन ग्रीक काळातील प्रमुख बोलीभाषा गट इ. स. पू. ११८० च्या नंतर विकसित झाले नसतील, दोरिसी आक्रमणांच्या वेळी — आणि अचूक वर्णमालेच्या लेखनाच्या रूपात त्यांचा पहिला वापर इ.स.पू. ८व्या शतकातील सुरू झाला. जर आक्रमणांचा ऐतिहासिक दोरिसी लोकांशी काही सांस्कृतिक संबंध नसतील, तर ते आक्रमण "दोरिसी" असे नाव पडणार नाही. हे माहीती आहे की या आक्रमणामुळे लोकसमुदाय नंतरच्या अतिकी-यवनी प्रदेशांमध्ये विस्थापित झाला, आणि हे लोक स्वतःला दोरिसी लोकांकडून विस्थापित झालेल्या किंवा त्यांच्याशी लडणाऱ्या लोकांचे वंशज मानत होते.

या काळातील ग्रीक लोकांचा असा मत होता की सर्व ग्रीक लोकांचे तीन प्रमुख विभाग होते – दोरिसी, आयोली आणि यवनी (अथेनी लोकांसहित), आणि प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण व वेगळी बोलीभाषा होती. आर्कादी अज्ञात पर्वतीय बोलीभाषा होती आणि ती ग्रीक अभ्यासाच्या केंद्रापासून दूर असलेली किप्री, यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले हे गृहीत धरल्यास, लोकांची आणि भाषेची ही विभागणी आधुनिक पुरातत्व-भाषिक संशोधनाच्या निष्कर्षांशी बरीच मिळतीजुळती आहे.

बोलीभाषांसाठी एक प्रमाणित सूत्र खालील आहे: []

शास्त्रीय काळात ग्रीसमधील ग्रीक बोलीभाषांचा वितरण

१. आयोलिया २. लेस्बोस ३. थेस्सालिया ४. बोयॉतिया ५. यवनदेश/इयोनीया ६. अत्तिका ७. लाकोनिया ८. आर्गोलिस ९. आखाइया १०. कोरिन्थ ११. कोस १२. थेरा १३. ह्रोदोस १४. क्रेते १५. देल्फी १६. दोरिस १७. फोकिस १८. एलिस १९. आर्कादिया

  • पश्चिम गट
    • वायव्य ग्रीक
    • दोरिसी
  • आयोली गट
    • आयगाई/आशियाई आयोली
    • थेस्साली
    • बोयॉती
  • यवनी-अतिकी गट
    • अतिकी
    • यवनी
      • एउबोयी आणि इतालियातील वसाहती
      • किक्लादी
      • आशियाई यवनी
  • आर्कादी-किप्री ग्रीक
    • आर्कादी
    • किप्री

पश्चिमी विरुद्ध अपाश्चात्य ग्रीक ही सर्वात ठळक आणि सर्वात पुराणी विभागणी आहे, ज्यात अपाश्चात्य ग्रीकचे यवनी-अतिकी आणि आयोनी विरुद्ध आर्कादी-किप्री, किंवा आयोली आणि आर्कादी-किप्री विरुद्ध यवनी-अतिकी असे उपसमूह आहेत. अनेकदा अपाश्चात्य ग्रीकला 'पूर्व ग्रीक' असेही म्हटतात.

आर्कादी-किप्री कांस्ययुगातील मिकीनी ग्रीक लोकांशी अधिक जवळून संबंधित होते असे वाटते.

बोयॉती ग्रीकवर वायव्य ग्रीकचा मोठा प्रभाव होता आणि काही बाबतीत तिला एक संक्रमणकालीन बोली असे मानले जाऊ शकते, जसे की बोयॉती कवी पिंदारोसच्या कवितांमध्ये दिसते, ज्यांनी थोड्या प्रमाणात आयोनी मिश्रणासह दोरिसी भाषेत लिहिले. [] त्याचप्रमाणे थेस्साली भाषेवरही वायव्य ग्रीकचा प्रभाव होता, जरी तो कमी प्रमाणात पडला होता.

अनातोलियाच्या नैऋत्य किनाऱ्यावरील एका लहानशा प्रदेशात बोलली जाणारी आणि शिलालेखांमध्येच जराशी जतन झालेली पाम्फिली ग्रीक भाषा, ही एकतर पाचवा प्रमुख बोलींचा गट असू शकते, किंवा ती दोरिसी भाषेने आच्छादलेली मिकी ग्रीक असू शकते, जिच्यासह गैर-ग्रीक प्रभाव असे. []

संबंधित भाषा

[संपादन]

फ्रिगी हे एक पश्चिम आणि मध्य अनातोलियामधील नामशेष हिंद-युरोपीय भाषा आहे, व आज आधुनिक ग्रीक याच्याशी जवळचे संबंध आहेत असे मानले जाते.[][][] ज्या हिंद-युरोपीय भाषा विद्यमान आहेत, त्यांमधील ग्रीकला आर्मेनी[१०] (ग्रेको-आर्मेनी पहा) आणि हिंद-इराणी भाषा (ग्रेको-आर्य पहा) या भाषा(समूहां)सोबत सर्वात जवळचे वांशिक संबंध आहेत असे मानले जाते.[११][१२]

ध्वनीशास्त्र

[संपादन]

आद्य-हिंद-युरोपीयपासून फरक

[संपादन]

प्राचीन ग्रीक भाषा आद्य-हिंद-युरोपीय (PIE) आणि इतर हिंद-युरोपीय भाषांपेक्षा काही बाबतीत वेगळी आहे. ध्वनिरचनेनुसार, प्राचीन ग्रीक शब्दांचा शेवटी फक्त स्वर किंवा /n s r/ नेच होऊ अंत शकत होता; γάλα "दूध" सारखे अंतिम स्पर्शांचे लोप पावले, γάλακτος दुधाचे" (षष्ठी विभक्ती) हे तुलनेसाठी पहा. अनेक ध्वनींच्या बदलांमुळे, [१३] विशेषतः खालील बदलांमुळे, शास्त्रीय काळातील प्राचीन ग्रीक भाषा मूळ आद्य-हिंद-युरोपीय स्वनिमांच्या सूची आणि वितरणात देखील वेगळे होती:

  • PIE चे *s शब्दाच्या सुरुवातीला /h/ झाले( कंठ्यीकरण ): लॅटिन sex (सेक्स), संस्कृत षट्, मराठी सहा, प्राचीन ग्रीक ἕξ /héks/ = ...
  • PIE चे s कंठ्यीकरणाच्या मध्यवर्ती टप्प्यानंतर स्वरांमध्ये लोप पावला: संस्कृत जनस्, लॅटिन generis (गेनेरिस) (जिथे र-करणानुसार s > r आहे), ग्रीक * genesos (गेनेसोस) > *genehos (गेनेहोस) प्राचीन ग्रीक γένεος ( /ɡéneos/ ), अतिकी γένους ( /ɡénoːs/ ) "एका प्रकारचा".
  • PIE चे y /j/ झाले /h/ (कंठ्यीकरण) किंवा /(d)z/ ( दृढीकरण ): संस्कृत यद्, प्राचीन ग्रीक ὅς /hós/ "कोण" (सापेक्ष सर्वनाम); लॅटिन iugum (युगुम), संस्कृत युग्म, प्राचीन ग्रीक ζυγός /zyɡós/.
  • PIE चे w मिकीनी आणि काही गैर-अतिकी बोलींमध्ये आढळणारे, लोप पावले: प्रारंभिक दोरिसी ϝέργον /wérɡon/, अवेस्ती 𐬬𐬀𐬭𐬆𐬰𐬆𐬨 (वरजम), अटिक ग्रीक ἔργον /érɡon/.
  • नंतरच्या ग्रीक बोलींमध्ये, PIE आणि मिकीनी ओष्ठ्यकण्ठ्यांचे रूपांतर साध्या स्पर्शांमध्ये (ओष्ठ्य, दन्त्य आणि कण्ठ्य) झाले: उदा., PIE चे अतिकीमध्ये /p/ किंवा /t/ बनले: अतिकी ग्रीकचे ποῦ /pôː/ "कुठे?", लॅटिन quō ; अतिकी ग्रीक τίς /tís/, लॅटिन quis "कोण?".
  • PIE चे घोष महाप्राणित स्पर्श bʰ dʰ ǵʰ gʰ gʷʰ (संस्कृतमधील पहिले चार भ, ध, झ, घ बनले आणि शेवटचे जास्तीतर वेळा घ बनले परंतु उ, ऊ, किंवा एक गोलाकार स्वर त्याच्यानंतर असेल, तर भ बनले) अघोष झाले आणि महाप्राणित स्पर्श φ θ χ प्राचीन ग्रीकमध्ये /pʰ tʰ kʰ/ बनले.

ध्वन्यात्मक सूची

[संपादन]

प्राचीन ग्रीक भाषेचा उच्चार आधुनिक ग्रीक भाषेपेक्षा अति वेगळा होता. प्राचीन ग्रीक भाषेत दीर्घ आणि ऱ्हस्व स्वर (जसे संस्कृतमधील इ वि. ई, किंवा उ वि. ऊ.); अनेक संयुक्त स्वर (जसे ऐ किंवा औ); द्वित्व (जसे क्क किंवा त्त) आणि एकवचनी व्यंजने; घोष, अघोष आणि महाप्राणित स्पर्श; आणि स्वराघात होते (अर्थ, वैदिक संस्कृतमधील उदात्त, अनुदात्त, व स्वरित स्वर, स्वर अक्षर किंवा आवाजांपासून वेगळे). आधुनिक ग्रीक भाषेत, सारे स्वर आणि व्यंजने ऱ्हस्व आहेत. एकेकाळी भिन्नपणे उच्चारले जाणारे अनेक स्वर आणि संयुक्त स्वर आता /i/ (इ) असे उच्चारले जातात( इ-करण ). संयुक्त स्वरांमधील काही स्पर्श आणि अर्धस्वर ऊष्मन् बनले आहेत, आणि स्वराघात बदलून साधे आघात बनला आहे. यातील बरेच बदल कोइने ग्रीक काळात झाले. तथापि, आधुनिक ग्रीकची लेखन प्रणाली सर्व उच्चार बदलांना प्रतिबिंबित करत नाही.

खालील उदाहरणे इ.स.पू. ५व्या शतकाचे अतिकी ग्रीक भाषेचे प्रतिनिधित्व करतात. प्राचीन उच्चारांची निश्चितपणे पुनर्रचना करता येत नाही, परंतु त्या काळातील ग्रीक भाषेचे दस्तऐवजीकरण उत्तम प्रकारे झालेले आहे, आणि अक्षरे ज्या ध्वनींचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या सामान्य स्वरूपाबद्दल भाषाशास्त्रज्ञांमध्ये जास्ती काही मतभेद नाहीत.

व्यंजने

[संपादन]
ओष्ठ्य वर्त्स्य कण्ठ्य कंठद्वारीय
अनुनासिक μ



/m/
ν



/n/
γ



( ŋ ) 1
स्पर्श घोष β



/b/
δ



/d/
γ



/ɡ/
अघोष π



/p/
τ



/t/
κ



/k/
महाप्राणित φ



/pʰ/
θ



/tʰ/
χ



/kʰ/
ऊष्मन् σ



/s/




/h/
अन्तस्थ λ



/l/
कंपन ρ



/r/
[ŋ] हे /n/ चा उपध्वनी म्हणून आढळले जो कण्ठ्यांच्या आधी आणि अनुनासिकांच्या आधी /ɡ/ चा उपध्वनी म्हणून वापरला जात होता.
/s/ हे [z] मध्ये आत्मसात केले गेले घोष व्यंजनांच्या आधी.
/h/ पूर्वी Η असे लिहिले जात होते पण जेव्हा तेच अक्षर ( ईटा ) /h/ या स्वरासाठी वापरले गेले शुद्धलेखनातून वगळण्यात आले, जे नंतर एका स्वरचिन्हाच्या, म्हणजेच घोगऱ्या श्वासाच्या, स्वरूपात पुनर्संचयित केले गेले.
/r/ शब्दाच्या सुरुवातीला आणि द्वित्व असताना कदाचित तो अघोष /r̥/ (संस्कृतातील ऋ सारखे) होता ( आणि ῥῥ असे लिहिले जात असे).

स्वर

[संपादन]
पुरोजिह्वीय संवृत
प्रसृतोष्ठ अतिकुंचितोष्ठ
संवृत ι



/i/ //
υ



/y/ //
अर्ध-संवृत ε ει



/e/ //
ο ου



/o/ //
अर्ध-विवृत η



/ɛː/
ω



/ɔː/
विवृत α



/a/ /aː/

/oː/ याचे संवृतीकरण होऊन [uː] झाले, कदाचित इ. स. पू. ४थ्या शतकपर्यंत.

पदरचनाशास्त्र

[संपादन]
किमॉन नावाचा ओस्त्राकोन, अत्तालोसचा स्तोआ(स्तोआ म्हणजे ओसरी)

इतर सर्व जुन्या हिंद-युरोपीय भाषांप्रमाणेच, जसे संस्कृतही, ग्रीक भाषा अत्यंत विभक्तियुक्त आहे. आद्य-हिंद-युरोपीय रूपे जतन करण्याच्या बाबतीत ती अति पुरातन आहे. प्राचीन ग्रीकमध्ये, नामांना (विशेष नामांसहित) पाच विभक्ती(प्रथम, द्वितीय, चतुर्थी, षष्ठी आणि संबोधन), तीन लिंगे ( पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग) आणि तीन वचने (एकवचन, द्विवचन आणि बहुवचन ) आहेत. क्रियापदांना चार वृत्ती ( स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि इच्छार्थ) आणि तीन प्रयोग ( सकर्मक, मध्यम आणि कर्मणी ) आहेत, तसेच तीन पुरुष (प्रथम, मध्यम आणि उत्तम) व इतर विविध रूपे आहेत.

क्रियापदांचे रूप सात काळ आणि गणांच्या संयोगांद्वारे (ज्यांना सामान्यतः फक्त "काळ" म्हटले जाते) घडवले जाते: वर्तमान, भविष्य आणि लङ् हे लङिक रूप आहेत; तर लुङ्, लिट्, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ हे लुङिक रूप आहेत. बहुतेक काळांमध्ये चारही वृत्ती आणि तीनही प्रयोग आढळतात, मात्र भविष्यकाळात आज्ञार्थी किंवा आज्ञार्थी प्रयोग नसतो. तसेच, अपूर्ण विध्यर्थ, इच्छार्थ किंवा आज्ञार्थ प्रयोगही नसतो. क्रियापदांचे धातूरूप आणि कृदंत रूपे ही काळ, अवस्था आणि प्रयोग यांच्या सान्त संयोगांशी जुळतात.

भूतकाळांच्या स्वार्थ रूपांमध्ये (किमान संकल्पनात्मकदृष्ट्या) /e-/ हा उपसर्ग जोडला जातो, ज्याला आगम म्हणतात. हा कदाचित मूळतः 'मग' यासारखा अर्थ असलेला एक पूर्णपणे वेगळा शब्द असत होता, जो जोडला गेला कारण आद्य-हिंद-युरोपीय (PIE) भाषांमध्ये काळांना प्रामुख्याने पैलूदर्शक अर्थ होता. हा आगम लुङ्, लङ् आणि पूर्ण भूतकाळ यांच्या स्वार्थांना जोडला जातो, परंतु लुङाच्या इतर कोणत्याही रूपांना नाही (लङ् आणि पूर्ण भूतकाळ इतर कोणतीही रूपे नाहीत).

ग्रीकमधील आगमचे दोन प्रकार आहेत: अक्षरात्मक आणि संख्यात्मक. अक्षरात्मक आगम व्यंजनांसोबत सुरू होणाऱ्या शब्दांना जोडला जातो आणि तो फक्त 'e' हा उपसर्ग लावतो (मात्र, 'r' ने सुरू होणाऱ्या शब्दांना 'er ' जोडला जातो). संख्यात्मक आगम स्वरांनी सुरू होणाऱ्या शब्दांशी जोडला जातो आणि त्यात स्वराचा उच्चार दीर्घ केला जातो.

  • a, ā, e, ē → ē
  • i, ī → ī
  • o, ō → ō
  • u, ū → ū
  • ai → ēi
  • ei → ēi किंवा ei
  • oi → ōi
  • au → ēu किंवा au
  • eu → ēu किंवा eu
  • ou → ou

नमुना मजकूर

[संपादन]

होमरच्या इलियासची सुरुवात प्राचीन ग्रीक भाषेच्या आद्य काळाचे उत्तम उदाहरण आहे (अधिक तपशिलासाठी होमरी ग्रीक पहा):


Μῆνιν ἄειδε, θεά, Πηληϊάδεω Ἀχιλῆος

οὐλομένην, ἣ μυρί' Ἀχαιοῖς ἄλγε' ἔθηκε,

πολλὰς δ' ἰφθίμους ψυχὰς Ἄϊδι προΐαψεν

ἡρώων, αὐτοὺς δὲ ἑλώρια τεῦχε κύνεσσιν

οἰωνοῖσί τε πᾶσι· Διὸς δ' ἐτελείετο βουλή·

ἐξ οὗ δὴ τὰ πρῶτα διαστήτην ἐρίσαντε

Ἀτρεΐδης τε ἄναξ ἀνδρῶν καὶ δῖος Ἀχιλλεύς.

प्लातोच्या आपोलोगियाची सुरुवात प्राचीन ग्रीकच्या शास्त्रीय काळातील अतिकी ग्रीकचे उदाहरण आहे. (दुसरी ओळ आयपीए (IPA) आहे, तर तिसरी ओळ आयपीए प्रमाणे मराठीत/देवनागरीत लिप्यंतरण आहे).   Ὅτι μὲν ὑμεῖς | ὦ ἄνδρες Ἀθηναῖοι | πεπόνθατε | ὑπὸ τῶν ἐμῶν κατηγόρων, οὐκ hóti men hyːmêːs | ɔ̂ː ándres atʰɛːnaî̯i̯oi | pepóntʰate | hypo tɔ̂ːn emɔ̂ːŋ होती मेन् हिमेस् | ऑ आन्द्रेस् आथेनाय्योइ | पेपोन्थाते | हिपो तॉन् एमॉङ् κατηγόρων | οὐκ οἶδα ‖ ἐγὼ δ'οὖν καὶ αὐτὸς | ὑπ' αὐτῶν ὀλίγου ἐμαυτοῦ | katɛːɡórɔːn | oːk oî̯da ‖ eɡɔ́ː dûːŋ kai̯ au̯tos | hyp au̯tɔ̂ːn olíɡoː emau̯tûː | कातेगोरॉन् | ओक् ओय्दा ‖ एगॉ दूङ् काय् आउतोस् | हिप् आउतॉन् ओलिगो एमाउतू ἐπελαθόμην | οὕτω πιθανῶς ἔλεγον ‖ Καίτοι ἀληθές γε | ὡς ἔπος εἰπεῖν epelatʰómɛːn | hǔːtɔː pitʰanɔ̂ːs éleɡon ‖ kaí̯toi̯ alɛːtʰéz ɡe | hɔːs épos eːpêːn एपेलाथोमेन् | हूतॉ पिथानॉस् एकेगोन् ‖ काय्तोइ आलेथेज गे | हॉस् एपोस् एपेन् | οὐδὲν εἰρήκασιν. ‖ | oːden eːrɛ̌ːkaːsin ‖ | ओदेन् एरेकासीन ‖

आधुनिक वापर

[संपादन]

शिक्षणात

[संपादन]

युरोपीय देशांमध्ये लॅटिनच्या अधिक प्राचीन ग्रीक भाषेच्या अभ्यासाला प्रबोधनकाळापासून ते २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान होते. अमेरिकेतही हेच खरे होते, जिथे राष्ट्राच्या अनेक संस्थापकांना शास्त्रीय शिक्षण मिळाले होते. [b] अमेरिकी महाविद्यालयांमध्ये लॅटिनवर भर दिला जात होता, परंतु विशेषतः वसाहतवादीत आणि सुरुवातीच्या राष्ट्रीय काळात ग्रीक भाषा देखील आवश्यक होती, [c] आणि १९व्या शतकाच्या मध्यापासून ते त्याच शतकाच्या शेवटीपर्यंत, म्हणजेच अमेरिकी हेलेनप्रेमाच्या (ग्रीक संस्कृतीबद्दल प्रेम) काळात, प्राचीन ग्रीसचा अभ्यास अधिकाधिक लोकप्रिय झाला. [१८] विशेषतः, त्या काळातील स्त्री बुद्धिजीवींनी "साहित्यिक" होण्यासाठी प्राचीन ग्रीक भाषेवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक मानले. [१९]

संदर्भ

[संपादन]

Page साचा:Reflist/styles.css has no content.

  1. Dalby, Andrew (28 October 2015). Dictionary of Languages: The definitive reference to more than 400 languages. Bloomsbury Publishing. p. 230. ISBN 978-1-4081-0214-5. 10 June 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2024 रोजी पाहिले.
  2. Ralli, Angela (2012). "Greek". Revue belge de Philologie et d'Histoire. 90 (3): 964. doi:10.3406/rbph.2012.8269. 30 September 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 January 2021 रोजी पाहिले.
  3. Hose, Martin; Schenker, David (2015). A Companion to Greek Literature (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. p. 445. ISBN 978-1118885956.
  4. Newton, Brian E.; Ruijgh, Cornelis Judd (13 April 2018). "Greek Language". Encyclopædia Britannica. 20 May 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 May 2019 रोजी पाहिले.
  5. Gerber, Douglas E. (1997). A Companion to the Greek Lyric Poets. Brill. p. 255. ISBN 90-04-09944-1.
  6. Skelton, Christina (2017). "Greek-Anatolian Language Contact and the Settlement of Pamphylia" (PDF). Classical Antiquity. 36 (1): 104–129. doi:10.1525/ca.2017.36.1.104. 2021-04-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-04-17 रोजी पाहिले.
  7. ब्रिश, क्लो. "Le Phrygien". फ्रां. मध्ये. बेडर (सं.), Langues indo-européennes, पृ. १६५–१७८, Paris: CNRS Editions.
  8. Brixhe, Claude (2008). "Phrygian". In Woodard, Roger D (ed.). The Ancient Languages of Asia Minor. Cambridge University Press. pp. 69–80. ISBN 978-0-521-68496-5. "Unquestionably, however, Phrygian is most closely linked with Greek." (p. 72).
  9. Obrador-Cursach, Bartomeu (2019-12-01). "On the place of Phrygian among the Indo-European languages". Journal of Language Relationship (रशियन भाषेत). 17 (3–4): 243. doi:10.31826/jlr-2019-173-407. With the current state of our knowledge, we can affirm that Phrygian is closely related to Greek.
  10. जेम्स क्लॅक्सन. Indo-European Linguistics: An Introduction. केम्ब्रिज विद्यापीठ छापखाना, २००७, पृ. ११–१२.
  11. बेंजमिन वि. फॉर्टसन. Indo-European Language and Culture. ब्लॅकवेल, २००४, पृ. १८१.
  12. हेनरी मॅ. होनिग्सवाल्ड, "Greek", The Indo-European Languages, सं. आन्ना जाकालोने रामात आणि पाओलो रामात (रूटलेज, १९९८ पृ. २२८–२६०), पृ. २२८.

    BBC: Languages across Europe: Greek Archived 2020-11-14 at the वेबॅक मशीन.
  13. Fortson, Benjamin W. (2004). Indo-European language and culture: an introduction. Malden, Mass: Blackwell. pp. 226–231. ISBN 978-1405103152. OCLC 54529041.
  14. Gummere, Richard M. (1963). The American Colonial Mind and the Classical Tradition. Harvard University Press. p. 66. ISBN 978-0313238901.
  15. Reinhold, Meyer (1984). Classica Americana: The Greek and Roman Heritage in the United States. Wayne State University Press. p. 27. ISBN 978-0814317440.
  16. Cremin, Lawrence A. (1970). American Education: The Colonial Experience, 1607–1783. Harper & Row. pp. 128–129. ISBN 978-0061316708.
  17. Rudolph, Frederick (1978). Curriculum: A History of the American Undergraduate Course of Study Since 1636. Jossey-Bass. pp. 31–32. ISBN 978-0875893587.
  18. Winterer, Caroline (2002). The Culture of Classicism: Ancient Greece and Rome in American Cultural Life, 1780–1910. Johns Hopkins University Press. pp. 3–4. ISBN 978-0801878893.
  19. Prins, Yopie (2017). Ladies' Greek: Victorian Translations of Tragedy. Princeton University Press. pp. 5–6. ISBN 978-0691141893. See also Kearley, Timothy (2022). Roman Law, Classical Education, and Limits on Classical Participation in America into the Twentieth-Century. Veterrimus Publishing. pp. 54–55, 97–98. ISBN 978-1736131213.

अधिक वाचन

[संपादन]
  • अ‍ॅडम्स, मॅथ्यू. "इंग्रजी शाळांमध्ये ग्रीक भाषेचा परिचय." ग्रीस अँड रोम ६१.१: १०२–१३, २०१४. JSTOR ४३२९७४९० .
  • ॲलन, रुटगर जे. "विषय बदलणे: प्राचीन ग्रीक शब्द क्रमातील विषयाची स्थिती." निमोसिन: बिब्लिओथेका क्लासिक बटावा 67.2: 181–213, 2014.
  • अथेनाझे: प्राचीन ग्रीक भाषेचा परिचय (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस). [शालेय वापरासाठी प्रकाशित प्राचीन ग्रीक भाषेवरील पाठ्यपुस्तकांची मालिका.]
  • बॅकर, एगबर्ट जे., संपादक. अ कंपॅनियन टू द एन्शियंट ग्रीक लँग्वेज. ऑक्सफर्ड: वायली-ब्लॅकवेल, २०१०.
  • बीक्स, रॉबर्ट एस. पी. ग्रीक भाषेचा व्युत्पत्तिशास्त्रीय शब्दकोश. लीडेन, नेदरलँड्स: ब्रिल, २०१०.
  • चँट्रेन, पियरे . Dictionnaire étymologique de la langue grecque, नवीन आणि अद्यतनित संस्करण., जीन टेलर्डॅट, ऑलिव्हियर मॅसन आणि जीन-लुई पेरपिलो यांनी संपादित केले. 3 व्हॉल्स. पॅरिस: क्लिंक्सिएक, 2009 (1ली आवृत्ती. 1968-1980).
  • क्रिस्टिडिस, अनास्तासिओस-फोइबोस, संपा. प्राचीन ग्रीकचा इतिहास: सुरुवातीपासून ते उत्तरकालीन प्राचीनतेपर्यंत . केंब्रिज: केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, २००७.
  • ईस्टरलिंग, पी. आणि हँडली, सी. ग्रीक लिपी: एक सचित्र परिचय . लंडन: सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ हेलेनिक स्टडीज, २००१. ISBN ०-९०२९८४-१७-९
  • फोर्टसन, बेंजामिन डब्ल्यू. इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृती: एक परिचय. दुसरी आवृत्ती. ऑक्सफर्ड: वायली-ब्लॅकवेल, २०१०.
  • हॅन्सेन, हार्डी आणि क्विन, जेराल्ड एम. (१९९२) ग्रीक: एक सघन अभ्यासक्रम, फोर्डहॅम युनिव्हर्सिटी प्रेस
  • हॉरॉक्स, जेफ्री. ग्रीक: भाषेचा आणि तिच्या भाषकांचा इतिहास. दुसरी आवृत्ती. ऑक्सफर्ड: वायली-ब्लॅकवेल, २०१०.
  • जांको, रिचर्ड. "महाकाव्यीय शब्दशैलीचा उगम आणि उत्क्रांती." द इलियड: अ कॉमेंटरी मध्ये. खंड ४, पुस्तके १३-१६. रिचर्ड जांको संपादित, ८-१९. केंब्रिज, युके: केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, १९९२.
  • जेफरी, लिलियन हॅमिल्टन. प्राचीन ग्रीसच्या स्थानिक लिपी: ए. डब्ल्यू. जॉन्स्टन यांच्या पुरवणीसह सुधारित आवृत्ती. ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९०.
  • मोरपुर्गो डेव्हिस, अ‍ॅना, आणि इव्हस डुहॉक्स, संपादक. अ कंपॅनियन टू लिनियर बी: मायसेनियन ग्रीक टेक्स्ट्स अँड देअर वर्ल्ड. खंड १. लुवेन, बेल्जियम: पीटर्स, २००८.
  1. मिकीनी ग्रीक अस्पष्टपणे प्रमाणित आहे आणि जरासे पुनर्रचनित आहे रेखीय बी अशा अयोग्य लिपीच्या प्रयोगामुळे
  2. Thirty-six of the eighty-nine men who signed the Declaration of Independence and attended the Constitutional Convention went to a colonial college, all of which offered only the classical curricula.[१४] Admission to Harvard, for example, required that the applicant "Can readily make and speak or write true Latin prose and has skill in making verse, and is competently grounded in the Greek language so as to be able to construe and grammatically to resolve ordinary Greek, as in the Greek Testament, Isocrates, and the minor poets."[१५]
  3. Harvard's curriculum was patterned after those of Oxford and Cambridge, and the curricula of other colonial colleges followed Harvard's हार्वर्डचे आभ्यासक्रम ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज या दोघांवरती बनला गेला होता, आणि दुसऱ्या वसाहती विद्यापीठ हार्वर्डच्या पावलांवर पाऊल ठेवले.[१६][१७]
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.