प्रशांत तामांग
| प्रशांत तमंग | |
|---|---|
प्रशांत तामांग | |
| आयुष्य | |
| जन्म | जानेवारी ४, १९८३ |
| मृत्यू | ११ जानेवारी, २०२६ (वय ४३) |
| संगीत साधना | |
| गायन प्रकार | पॉप संगीत |
| संगीत कारकीर्द | |
| कार्यक्षेत्र | पोलिस, इंडियन आयडॉल३ चा विजेता |
| कारकिर्दीचा काळ | २००७ ते २०२६ |
| गौरव | |
| पुरस्कार | इंडियन आयडॉल ३ चा उपविजेता |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रशांत तमंग (४ जानेवारी १९८३ – ११ जानेवारी २०२६) हे काठमांडू येथे राहणारे एक भारतीय गायक आणि चित्रपट अभिनेते होते. [१] तो २००७ मध्ये 'इंडियन आयडल सीझन ३' चा विजेता होता.[२][३]
पार्श्वभूमी
[संपादन]प्रशांत तमंग याचा जन्म भारतातील पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला. त्याचे आई-वडील रूपा तामांग आणि मदन तामांग हे होते. त्याने सेंट रॉबर्ट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. वडिलांच्या अपघाती निधनानंतर, प्रशांतने शाळा सोडून वडिलांच्या जागी कोलकाता पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नोकरी पत्करली.[४][५][६] कोलकाता पोलिसांमध्ये असताना, तो पोलीस ऑर्केस्ट्रामध्ये गात असे. त्याच्या कुटुंबात त्याची आजी, आई आणि बहीण अर्चना यांचा समावेश होता. त्याने १६ फेब्रुवारी २०११ रोजी भारतातील नागालँड येथे गीता थापा (मार्था ॲली) हिच्याशी विवाह केला. ती एक विमान परिचारिका आहे.[७]
प्रशांतचे ११ जानेवारी २०२६ रोजी, वयाच्या ४३ व्या वर्षी, नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[८]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Re: Who is Nepali/Nepalese?". www.nepalboard.de. 9 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ Indian Idol 3 Archived 4 June 2007 at the वेबॅक मशीन.
- ↑ "Meet Prashant Tamang, the sniper in Paatal Lok 2 and former Indian Idol winner". India Today (इंग्रजी भाषेत). 21 January 2025.
- ↑ "Prashant Tamang in Indian Idol 3". 1 September 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 January 2020 रोजी पाहिले.
- ↑ "News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News Headlines, Live News Updates". News18. 9 January 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ Nepal Nation Archived 9 October 2007 at the वेबॅक मशीन.
- ↑ "Prashant Tamang Got Married Secretly". 10 March 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2011 रोजी पाहिले.
- ↑ "इंडियन आयडॉल ३ चा विजेता प्रशांत तामांग याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला". myrepublica.nagariknetwork.com (इंग्रजी भाषेत). 2024-08-08. 2026-01-11 रोजी पाहिले.
- इ.स. २०२६ मधील मृत्यू
- विस्तार विनंती
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from January 2026
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- इंडियन आयडॉल ३
- इ.स. १९८३ मधील जन्म
- भारतीय पुरुष गायक
- कोलकाता येथील गायक
- नेपाळी-भाषेतील भारतीय गायक
- इंडियन आयडल विजेते
- दार्जिलिंगचे संगीतकार
- भारतीय गोरखा
- काठमांडूचे संगीतकार
- तामांग लोक
- दार्जिलिंगचे पुरुष अभिनेते
- २१व्या शतकातील भारतीय पुरुष अभिनेते