Jump to content

प्रवीण दाटके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रवीण दाटके

नागपूर मध्यचे आमदार
मागील विलास कुंभारे
मतदारसंघ नागपूर मध्य

नागपूरचे महापौर
मागील अनिल सोले
पुढील नंदा जिचकार

जन्म ६ डिसेंबर, १९७८
नागपूर, महाराष्ट्र
वडील प्रभाकरराव दाटके
पत्नी प्रवदा दाटके
अपत्ये २ मुली

प्रवीण प्रभाकरराव दाटके (१६ डिसेंबर, १९७८:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) हे मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत नागपूर मध्य मतदारसंघातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी हे भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी महापौर [] [] [] होते. २००४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी दाटके महाल वॉर्डमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. दोन मुदतींनंतर ते नंतर नागपूर महानगरपालिकेचे महापौर झाले.

या निवडणुकीआधी दाटके १४ मे २०२० रोजी आमदारांच्या मतांनी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले [] []

दाटके यांचे वडील शिक्षक सहकारी बँक लिमिटेडचे संस्थापक प्रभाकरराव दटके होत.

प्रवीण दाटके हे नागपूरच्या महाल भागातील नवयुग माध्यमिक विद्यालय येथून १०वी पास आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. Press Trust of India (5 September 2014). "BJP's Praveen Datke elected Nagpur Mayor". business-standard.com. 1 October 2015 रोजी पाहिले.
  2. "Pravin Datke, Munna Pokulwar take charge as Mayor, Deputy Mayor in a glittering ceremony". nagpurtoday.in. 8 September 2014. 1 October 2015 रोजी पाहिले.
  3. "BJP's Nanda Jichkar elected Nagpur Mayor". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-03-05. 2017-03-05 रोजी पाहिले.
  4. The Indian Express (15 May 2020). "Maharashtra CM Uddhav Thackeray, eight others elected to Legislative Council" (इंग्रजी भाषेत). 24 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2024 रोजी पाहिले.
  5. The Times of India (23 November 2024). "Maharashtra election results 2024: Constituency-wise full winners list and key highlights". 24 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 November 2024 रोजी पाहिले.