प्रवीण घुगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
Pravin Ghuge

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात प्रवीण घुगे यांचा जन्म झाला. अणदूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असतानाच विविध उपक्रमात सहभाग असायचा. वडिल प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत असल्याने घरात शैक्षणिक पोषक वातावरण असायचे. इयत्ता चौथी व सातवीत होणार्‍या शिष्यवृत्ती परिक्षा उत्तीर्ण केली. सातवी इयत्तेतील शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा शैक्षणिकदृष्ट्या मागे नाही हेच दाखवून दिले. गावातच जवाहर विद्यालय या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. शाळेत होणार्‍या विद्यार्थांच्या निवडणूकीत हिरिरीने सहभाग असायचा. दहावीत शिकत असताना शाळेत मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकत आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवून दिली. "माझ्या अंगी नेतृत्वगुण आणि लोकशाही मुल्ये रुजवण्यामध्ये जवाहर विद्यालयातील संस्काराचे मोठे योगदान राहिले आहे." असे ते आवर्जून सांगतात. कॉँग्रेसचे आमदार राहिलेले आणि शाळेचे तत्कालिन मुख्याध्यापक श्री. सिद्रामप्पा आलूरे गुरुजी यांच्याविषयी नितांत आदर असल्याचेही ते नेहमी सांगतात.

राजकारणाचा कोणत्याही स्वरूपाचा कौटुंबिक वारसा नसताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री, राष्ट्रीय मंत्री नंतर भाजपाचे मराठवाडा विभाग संघटनमंत्री असा प्रवास करीत  आता बालहक्क संरक्षण आयोगाची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

अणदूर येथे महाविद्यालयात शिकत असताना वर्तमानपत्रातून जम्मू काश्मीरमधील वाढत्या आतंकवादविरोधात  अभाविप ने कॉलेज बंद ची हाक दिल्याची बातमी प्रकाशित झाली होती , काश्मीरच्या विषयात विदयार्थ्यांना अभाविप ने दिलेली आंदोलनाची हाक ऐकून आपल्या महाविद्यालयात त्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले. त्यावेळी प्रवीण घुगे हे ११वी त शिकत होते. अणदूर गावात कोणताही संपर्क न झालेल्या आंदोलनाचे वृत्त वाचून आंदोलन कोणी केले? या उत्सुकतेने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण घुगे यांच्याशी सपंर्क साधला आणि इथेच त्यांचा विद्यार्थी चळवळीचा प्रवास सुरु झाला. अणदूर च्या ग्रामीण भागात असणार्‍या कॉँग्रेसच्या राजकीय प्रभावक्षेत्रात विद्यार्थी परिषदेचे काम फार कठीण असताना देखील त्यांनी पाय रोवून काम सुरु केले.एका बाजूस संघटनेचे कार्य सुरु असतानाच नळदुर्गच्या अंजनी प्रशालेत नोकरी पण केली. सकाळी कॉलेज , दुपारी कॉलेजातील नोकरी व त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत परिषदेचे काम हा त्यांचा ठरलेला दिनक्रम होता. १९९० साली 'काश्मीर बचाओ' मुळे अभाविप शी संपर्क आल्यानंतर आधी अणदूर येथे अभाविप चे मंत्री म्हणून व नंतर धाराशिव येथे जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. याचदरम्यान अणदूर गावात स्वामी विवेकानंद वाचनालय सुरु करुन गावाच्या विकासासाठी तरुणांची फळी निर्माण केली. महाविद्यालयातील प्रश्नांविषयी आंदोलन तसेच गावातील स्वच्छतेविषयी जनजागरण आणि आंदोलनही केले.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्नामुळे समाजजीवन ढवळून निघाले होते. समाजात विद्वेषाचे वातावरण तयार झाले होते. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव विद्यापीठास दिले पाहिजे यासाठी नामांतर चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. अभाविपच्या माध्यमातून संवाद पथके निर्माण करून गावागावात प्रवास करुन समाजातील दुही कमी करण्यासाठी प्रयत्न केले. नामांतर समर्थन परिषदांचे आयोजन करुन या प्रश्नाला तडीस नेण्याच्या कार्यात हिरिरीने भाग घेतला.

रामजन्मभूमी आंदोलन असेल, सामाजिक प्रवासातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा असेल अशा अनेक महत्वपूर्ण बाबींत आपले विचार अतिशय बेधडक पणे मांडण्याचे प्रवक्तेपण साकारले.

१९९४ साली त्यांनी अभाविप चे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. घर, नोकरी, गाव सर्व सोडून विनावेतन संघटना सांगेल तिथे काम करण्याचा मनी निश्चय करून अभाविपच्या परंपरेचे पाईक बनून राहिले.


ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घेत या भागात विद्यार्थ्यांचे उत्तम संघटन उभे केले. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना उत्तम संघटक म्हणून दुर्गम भागातील उदा. वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा, येथील अतिशय छोट्यातल्या छोट्या प्रश्नांचे निरसन केले. तसेच परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन,प्रश्नाचा पूर्ण अभ्यास करून त्या  संबंधातील सरकारचे नियम, जीआर, आजची आकडेवारी याचा सर्व अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांसमोर ते मांडून त्यावर उपाययोजना केल्या. आदिवासी विद्यार्थांच्या वसतिगृहांमध्ये दिल्या जाणार्‍या सुविधांबाबत तसेच आश्रम शाळांच्या  प्रश्नांविषयी सातत्याने आवाज उठवत आंदोलने केली. वनवासी विद्यार्थांच्या प्रश्नांविषयी मुंबईत झालेल्या 'ठिय्या आंदोलनात'ही त्यांचे महत्वाचे योगदान राहिले. तलासरी, जव्हार परिसरातील कम्युनिस्टांच्या गुंडागर्दीस सडेतोड उत्तर देत आक्रमक विद्यार्थी संघटना बांधणी केली.  वनवासी भागात काम करत असताना जव्हार या ठिकाणचे पारंपारिक वेशातील नृत्य 'वनोत्सव' या सांस्कृतिक कार्यक्रमात नव्या कल्पनेने लोकांसमोर मांडले. हा 'वनोत्सव' आता पारंपरिक कार्यक्रम बनला असून जव्हार नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक दसर्‍याला त्याचे आयोजन करण्यात येते.

अनेक विद्यार्थी आंदोलनात यशस्वी नेतृत्व केले. परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स मिळाली पाहिजे असा आग्रह धरत आंदोलन उभे केले. कर्नाटकमध्ये बेंगळूर आणि धारवाड विद्यापीठामध्ये याविषयी अभ्यास करण्यासाठी प्रवास केला आणि राज्यपालांकडे सविस्तर निवेदन दिले. परिणामस्वरुप महाराष्ट्राच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळ (JBVC) बैठकीमध्ये यावर तीत चर्चा हून राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी याबाबतचे निर्देश दिले. उत्तर पत्रिकेचे झेरॉक्स मिळण्याचा सर्व विद्यापिठांनी घेतलेला निर्णय घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाची सर्वांनीच प्रशंसा केली.

विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत नवनवीन कार्यक्रम , आंदोलने, जनसंपर्क, विद्यार्थी परिषदेच्या कार्याला वेगळी दिशा देणं, महाराष्ट्राची शैक्षणिक स्थिती व त्यातील समस्या सोडवण्याकरिता मार्ग काढणे अशा अनेक विषयांत धडपड करून स्वतः ला सिद्ध केले. या नेतृत्व गुणामुळे प्रवीण घुगे अभाविपचे यशस्वी महाराष्ट्र प्रदेश मंत्री व पुढे राष्ट्रीय मंत्री झाले. हा पदभार संभाळताच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होणारे बाजारीकरण शिक्षणाची अवाच्या सव्वा आकारली जाणारी फी तसेच साधन-सुविधांचा अभाव , अपुरे व कमी गुणवत्तेचे शिक्षकवर्ग आणि ग्रंथालय व प्रयोग शाळा याची अपुरी व्यवस्था हे सर्व लक्षात घेता, शिक्षणव्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आंदोलन पुकारले.  वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि संस्थाचालकांची मनमानी याविषयीचे महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. या प्रश्नांविषयी थेट सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. अभाविप ची भुमिका प्रवीण घुगे यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली. त्यांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्यामध्ये 'शुल्क नियंत्रण समिती' आणि 'प्रवेश नियंत्रण समिती' असली पाहिजे असा ऐतिहासिक निर्णय दिला. आणि यासंबंधी सर्व राज्यानी कायदा करावा असे आदेश दिले.  विद्यार्थ्यांच्या एकजुटीला विजय मिळवून देऊन त्याचा गाजावाजा न करता, प्रवीण जी मात्र त्यांच्या पुढील समाज कामात व्यस्त झाले.

अभाविप मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आंदोलनाच्या प्रभावळीतच रमण्याचा प्रयत्न न करता घुगे यांनी मात्र परिषदेची वैचारिक बैठक देखील अंगिकारली होती.

प्रवीण घुगे यांच्या जडणघडणीतील मोलाचा वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातो. लहानपणापासूनच ते  राष्ट्रीय स्वयं सेवक संघात काम करत आले आहेत. १९९४ ते २००६ या काळात संस्थेच्या राष्ट्रभक्ती व संस्कृती प्रसार व संवर्धनासाठी अनेक कामे केली. तसेच समाजहितोपयोगी सेवाभाव ठेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित होऊन संघाच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत आले आहेत.

राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना

२००६ पासून अभाविप चे पूर्ण वेळ काम थांबवून भारतीय जनता पार्टी मध्ये काम करण्याचे त्यांनी  ठरविले. मराठवाडा विभाग संघटन मंत्री म्हणून त्यांनी मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाचे काम वाढविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु केले. अनेक आंदोलने, निवडणुका, पक्षाचे संघटनात्मक कार्यक्रम यासाठी सतत प्रवास करत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. मा. गोपीनाथ मुंडे यांची संघर्षयात्रा, गोदापरिक्रमा असो किंवा ऊस दरवाढीचे आंदोलन असो कि पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असो प्रत्येक वेळी प्रवीण घुगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले.


वाचनसंस्कृतीचा गाढा अभ्यास असणारे व फक्त कार्यशीलच नव्हे तर ज्ञान समृद्ध असे तसेच प्रतिस्पर्धी, सत्ता,  प्रतिष्ठा, धन या सर्वातून अलिप्त राहून समाजकारण हे एकच ध्येय असणारे नेते आहेत.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आल्यानंतर लहान मुलांची अनेक  बालगृहे, आश्रमशाळा यांना भेटी देत प्रवीण घुगे यांनी या प्रश्नांची व्यापकता लक्षात घेतली. घरदार नसणाऱ्या मुलांचे जीवन किती कठीण परिस्थितीतून जाते याचे थक्क करणारे रूप लक्षात आल्यानंतर त्यासाठी कार्यक्रमातून, उपक्रमातून प्रत्यक्ष योजनांची आखणी केली. बालकांच्या प्रश्नांचा आवाका मोठा आहे हे लक्षात घेता, घरात राहणाऱ्या तरी असुरक्षित, घर नसलेली समस्याग्रस्त बालके, शिक्षणापासून वंचीत बालके, अत्याचार पीडित बालके, बालकामगार अशा अनेक तर्हेने याचे बारकावे समजून घेऊन अध्यक्ष म्हणून आपल्या कामाला जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न घुगे यांनी केला आहे. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि मुलांना सुविधा यासाठी सरकारी यंत्रणा आणि संस्था यांच्या कामात सुसूत्रता कशी आणता येईल याचा विचार त्यांनी बाल हक्क संरक्षण आयोगात केला आहे. International justice mission च्या सहयोगाने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगबरोबर मुलांच्या हक्कासाठी तसेच लैंगिक अत्याचार आणि पिळवणूक यापासून मुलांची सोडवणूक व्हावी यासाठी घुगे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. यापैकीच एक महत्त्वपुर्ण उपक्रम म्हणजे 'चिराग' मोबाईल ऍप्लिकेशन. या aap द्वारे स्मार्ट फोनधारक कोणीही व्यक्ती प्रौढ, स्त्री पुरुष, वयस्कर, बालक , मुलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नोंदणी करू शकतात.

अशाप्रकारे प्रवीण घुगे यांनी तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर केला आहे. मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांनी २०१७ मध्ये 'भारत यात्रा' काढली होती. प्रवीण घुगे यांनी या महत्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा दिला होता. नोबेल सन्मानार्थी कैलाश सत्यार्थी यांना मुबंई येथे आमंत्रित करून 'जाणीवजागृती' कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे व विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. JJ Act आणि विशेषतः POCSO Act च्या अंमलबाजवणी संबंधी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रवीण घुगे यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी विविध बैठका व प्रशिक्षण कार्यक्रम घेतले .तसेच लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांसाठी पुनर्वसन व कायद्याची अंमलबजावणी आणि तरतुदी संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. या प्रशिक्षण वर्गाचा मुख्य हेतू म्हणजे महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये बालकांच्या खटल्याशी संबंधीत न्यायाधीश, तपास यंत्रणेतील पोलिस अधिकारी व शासकीय अधिकारी यांना एका व्यासपीठावर आणून POCSO ActJJAct यामधील महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करणे, आदर्श संकल्पनांचे सादरीकरण करणे आणि या कायद्याची अंमलाजवणी, आव्हाने व त्यावरील उपाय हा होता. यात न्यायाधीश, उच्चपदस्य पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील अनुभवी लोक तसेच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या विभागातून सुमारे ३६५ सदस्य या प्रशिक्षण वर्गात उपस्थित होते.

प्रवीण घुगे यांनी सर्वसामान्य मुलांपासून ते  वंचित मुले, वीटभट्टी, उपहारगृहे, कारखाने इत्यादी ठिकाणी काम करत असणाऱ्या मुलांशी स्वतः संवाद साधून वेळोवेळी त्यांना आत्मविश्वास दिला आणि या मुलांना न्याय मिळावा म्हणून unisefमहाराष्ट्र शासन यांच्या बरोबर काही करार हि केले तसेच विविध कार्यक्रम राबविण्यासाठी व सहकार्य मिळविण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा घडवून आणली.

विशेष कामगिरी म्हणजे अनाथ व रस्त्यावरील मुलांना आधार कार्ड मिळवून देण्याचे काम देखील घुगे यांनी केले. अनाथांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. तसेच 'family for every child' अभियान राबवत राज्यात दत्तक प्रक्रिया , प्रतिपालकत्व प्रक्रिया (Foster Family)  व प्रयोजकत्त्व यासाठी सातत्याने पुरवठा सुरु आहे. राज्यातील प्रत्येक बालकास कुटुंब मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने याविषयी नियमावली बनवण्यास बाध्य केले. यानुसार कार्यवाही करण्यासाठी ते आग्रही आहेत..