Jump to content

प्रविणा देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रविणा अनिरुद्ध देशपांडे
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावPravina संपादन
आडनावदेशपांडे संपादन
जन्म तारीख1965 संपादन
मृत्यू तारीख१७ फेब्रुवारी 2026 संपादन
व्यवसायअभिनेता संपादन

प्रविणा अनिरुद्ध देशपांडे या एक दिग्गज मराठी आणि हिंदी अभिनेत्री होत्या, ज्यांनी चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. 'रेडी', 'एक व्हिलन', 'गब्बर इज बॅक', आणि 'द फॅमिली मॅन' सारख्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी काम केले होते.[][][] १७ फेब्रुवारी २०२६ रोजी, वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][]

कारकिर्द

[संपादन]

त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात मराठी रंगभूमीवरून (थिएटर) केली होती. कालांतराने त्या हिंदी आणि मराठी सिनेमात स्थिरावल्या. त्यांनी सुमारे २५ हून अधिक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.[][][]

हिंदी चित्रपट 'मुंबई मेरी जान' (२००८) मधून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर त्या 'रेडी' (२०११ - सलमान खानची सह-कलाकार), 'एक व्हिलन' (२०१४), 'बोस: डेड/अलाईव्ह' 'परमाणु' (२०१८), 'जलेबी' (२०१८) आणि 'ब्लॅकमेल' यांसारख्या चित्रपटांत दिसल्या. याच सोबत त्यांनी 'घर एक मंदिर', 'कुमकुम', 'करम अपना अपना', 'कुल्फी कुमार बाजेवाला' आणि 'रक्तांचल' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.[][][]

निधनापूर्वी त्यांनी नीरज पांडे दिग्दर्शित 'तस्करी' या मालिकेत इमरान हाश्मी सोबत शेवटची भूमिका साकारली. त्या 'द फॅमिली मॅन ३' आणि 'रॉकेट बॉईज' यांसारख्या वेब सिरीजचाही भाग होत्या.[][][]

निवडक चित्रपटांची यादी

[संपादन]
  • मुंबई मेरी जान (२००८)
  • रेडी (२०११)
  • बॉम्बे टॉकीज (२०१३)
  • डी-डे (२०१३)
  • मान्सून शूटआउट (२०१३)
  • एक विलन (२०१४)
  • क्रेझी कुक्कड फॅमिली (२०१५)
  • गब्बर इज बॅक (२०१५)
  • अलीगढ (२०१५)
  • गाव (२०१८)
  • ब्लॅकमेल (२०१८)
  • गोलक बुगनी बँक ते बटुआ (2018)
  • परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण (2018)
  • जलेबी (२०१८)
  • हॅक्ड (२०२०)

निधन

[संपादन]

२०१९ पासून, त्या रक्ताचा कर्करोग (मल्टीपल मायलोमा) या आजाराने त्रस्त होत्या. सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत आठ महिन्यांच्या विश्रांती नंतर, त्या पुन्हा कामावर परतल्या. त्यांनी द फॅमिली मॅन ३ मध्ये मनोज वाजपेयीच्या आईच्या भूमिकेचे शूटिंग विग घालून पूर्ण केले.[] १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दुपारी ३ वाजता अंधेरी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[][] त्यांच्या पश्चात त्यांचे पती अनिरुद्ध देशपांडे, दोन मुले, सुना आणि नातवंडे आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 4 5 6 "प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". दैनिक लोकमत. २०२६-०२-१७ रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 5 6 "मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, इम्रान हाशमीसोबत केलेलं शेवटचं काम". एबीपी माझा. २०२६-०२-१७ रोजी पाहिले.
  3. 1 2 3 4 "कलाविश्वावर शोककळा! मराठी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचं निधन; चाहत्यांनी अर्पण केली आदरांजली". महाराष्ट्र टाइम्स. २०२६-०२-१७ रोजी पाहिले.
  4. 1 2 "Pravina Deshpande opens up on her battle with cancer". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश भाषेत). २०२६-०२-१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]