प्रवासी भारतीय दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.[१] ह्याप्रIत्यर्थ २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते. ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजिiत केले जातात.

२०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यादी[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ थरूर, शशी. "The Global Indian".

बाह्य दुवे[संपादन]