Jump to content

प्रमिला सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रमिला सेन ऊर्फ प्रमिला देवी (जन्म - १९२० चितगाव [], मृत्यू - १९९५[]) - श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या अनुयायी. शिक्षिका, वसतिगृह प्रमुख, लेखिका या नात्याने त्या ओळखल्या जातात.

जीवन

[संपादन]

लहान वयातच वैधव्य प्राप्त झाले. नोव्हेंबर १९४१ मध्ये त्या श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या. तेव्हा त्यांना धुलाई आणि बेकरी विभागात काम देण्यात आले. कारण त्यांचे बंधू जतींद्रनाथ हे त्या दोन्ही विभागांचे प्रमुख होते. आश्रमाची शाळा स्थापन झाल्यानंतर प्रमिला सेन यांनी तेथे इंग्रजी व फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. १९६२ सालपर्यंत त्यांनी बेकरीमध्ये काम केले आणि त्यानंतर श्रीमाताजींनी त्यांना झुनझुन होम या वसतिगृहाची जबाबदारी सोपविली. प्रमिला देवी या श्रीअरविंद आश्रमात १९४१ ते १९८० या कालावधीत राहत होत्या. त्यांनी श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे अध्यापनाचे काम देखील केले.

आश्रमातील जीवनावर आधारित त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्यामध्ये नोलिनी कांत गुप्ता, आंद्रे, अमृतदा, पवित्र, प्रणबदा, जनिना आणि भारती-दी यांच्या संबंधी आठवणींचा समावेश होतो.

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • द ल्युमिनस पास्ट (ऑगस्ट २०१४) - प्रमिला देवीच्या आठवणींचे बंगालीतून इंग्रजीत केलेले भाषांतर, सहलेखन - प्रमिला देवी आणि सुनयना पांडा. - प्रमिला देवी यांच्या श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास असतानाच्या आठवणी यामध्ये शब्दबद्ध करण्यात आलेल्या आहेत. या आठवणी प्रथम मदर इंडियाच्या अंकात सदर रूपाने प्रकाशित झालेल्या होत्या. ISBN: 978-0-9562923-3-9
  • उज्ज्वल अतीत (जानेवारी १९९७) - प्रमिला देवीच्या आठवणींचे मूळ बंगाली भाषेतील हे पुस्तक आहे. श्रीअरविंद आश्रम प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.[]

काही आठवणी

[संपादन]

प्रमिला देवी लिखित काही आठवणी (इंग्रजीत अनुवादित)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Pramila Sen - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-03-26 रोजी पाहिले.
  2. ^ "SABDA - The Luminous Past". www.sabda.in. 2025-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ www.amazon.in