प्रभू भोजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

ख्रिस्ताच्या जीवनाच्या अंतिम रात्री येशू ख्रिस्ताने आपल्या १२ शिष्यांसमवेत अंतिम भोजन घेतले. या प्रसंगी ख्रिस्ताने हातात भाकरी घेऊन मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊ केली तसेच द्राक्षरस भरलेला प्याला आपण पिऊन इतर शिष्यानाही देऊ केला. ख्रिस्ताने शिष्यांना म्हटले की ही भाकरी म्हणजे माझे शरीर आहे आणि हा द्राक्षरस म्हणजे माझे रक्त. या जेवणानंतर प्रभू येशूस रोमन सैनिकांनी पकडून नेले व सुळावर चढवले.

ख्रिस्ती धर्मीय लोक या प्रसंगाची आणि ख्रिस्ताने आपल्या सारख्या (?) पापी लोकांसाठी प्राणाचे बलिदान केल्याची आठवण म्हणून प्रभू भोजनाचा विधी अजूनही पाळतात. या प्रसंगी चर्चमधील धर्मगुरू / पाळक जमलेल्या भाविकांस भाकरीचा (यासाठी एक प्रकारचा वेफर वापरला जातो) तुकडा आणि द्राक्षरस (वाईन नव्हे) देतात. अनेकदा रोग्यांना बरे वाटावे म्हणूनही हा उपचार केला जातो.

ख्रिस्ताच्या जन्म, मरण, शिकवण यांची माहिती देणाऱ्या नव्या करारात या प्रसंगाचे उल्लेख खालीलप्रमाणे आहेत.

मत्तय कृत शुभवर्तमान २६वा अध्याय सारांश[संपादन]

..आणि ते जेवत असता येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून मोडली, आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला आणि उपकार मानले, आणि तो त्यांना दिला आणि म्हटले, “तुम्ही सगळे जण ह्यातून प्या. कारण हे माझं कराराचं रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी, ह्यापुढं, हा द्राक्षीचा उपज पिणार नाही.”[१]

मार्क कृत शुभवर्तमान अध्याय १४ वा सारांश[संपादन]

येशूने आपल्या शिष्यांतून दोघांना पाठवले आणि त्यांना सांगितले ,“पाण्याचा घडा घेतलेला मनुष्य तुम्हाला नगरात भेटेल, त्याच्या मागोमाग जा. ज्या घरात तो जाईल त्या घराचा मालक तुम्हाला एक मोठी, सजवून तयार केलेली, माडीवरची खोली दाखवील. तिथं आपल्यासाठी तयारी करा.”

सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी ते सर्व अनुभवले आणि त्यांनी वल्हांडणाची (एक ज्यू सण) तयारी केली. संध्याकाळी येशू आला आन शिष्यांबरोबर भोजन घेऊ लागला. जेवताना म्हणाला “मी तुम्हाला सत्य सांगतो, माझ्याबरोबर जेवणारा, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.”

शिष्य दुःखी होऊ झाले व त्याला विचारू लागले, “तो मी आहे काय?” येशू त्यांना म्हणाला , “बारांतला एक जण; तो माझ्याबरोबर थाळीत भिजवीत आहे. कारण मनुष्याचा पुत्र, खरोखर, त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणं जात आहे; पण ज्या कोणाकडून मनुष्याचा पुत्र धरला जाईल, त्याला कायमची हळहळ लागेल ! असा मनुष्य जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरं झालं असतं.”

जेवत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद मागून ती मोडली, आणि त्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझं शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला, आणि उपकार मानल्यावर तो त्यांना दिला आणि ते सर्व जण त्यातून प्याले. येशू त्यांना म्हणाला, “हे माझं कराराचं रक्त आहे. हे पुष्कळांसाठी ओतलेलं आहे. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी देवाच्या राज्यात नवा पिईन त्या दिवसापर्यंत मी ह्यापुढं द्राक्षीचा उपज पिणार नाही.” जेवण झाल्यावर सर्वांनी गीत गायले आणि ओलिव्ह वृक्षांच्या बागेकडे ते गेले

संदर्भ : मार्क कृत शुभवर्तमान


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


  1. ^ [https://marathibible.wordpress.com/ मत्तय कृत शुभवर्तमान