प्रभा गणोरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रभा रामचंद्र गणोरकर या पानावरून पुनर्निर्देशित)


प्रा.डॉ. प्रभा रामचंद्र गणोरकर (८ जानेवारी, इ.स. १९४५ - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे.

शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन[संपादन]

गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर द्वारका ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे.

अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी इंदिरा संत, करंदीकर, केशवसुत, गोविंदाग्रज, पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे.

डॉ. प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित)
  • एकेकीची कथा (संपादित, मूळ लेखक - गंगाधर गाडगीळ)
  • कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
  • किनारे मनांचे (१९९८)
  • गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७)
  • निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
  • बा.भ. बोरकर (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतले पुस्तक, १९९६)
  • बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०)
  • मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६)
  • वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश
  • विवर्त (कवितासंग्रह, १९८५)
  • व्यतीत (कवितासंग्रह, १९७४)
  • व्यामोह (कवितासंग्रह)
  • शांता शेळके यांची निवडक कविता (संपादित)
  • संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]