प्रकाश पोळ
प्रकाश पोळ | |
---|---|
[[File:|frameless|upright=1]] प्रकाश पोळ | |
जन्म नाव | प्रकाश पोळ |
जन्म |
ऑक्टोबर २३, इ.स. १९८७ ओंड |
राष्ट्रीयत्व |
भारतीय ![]() |
कार्यक्षेत्र |
साहित्य, इतिहास, समाज, धर्म, तत्त्वज्ञान, पुरोगामी चळवळ |
विषय | धर्म, इतिहास, तत्वज्ञान, समाज, संस्कृती |
चळवळ | फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ |
प्रभाव |
बुद्ध, चार्वाक, महावीर, महात्मा फुले, राजर्षी शाहू, बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी, पेरियार, संत तुकाराम, भगतसिंग आणि भाऊराव पाटील |
संकेतस्थळ | http://www.sahyadribana.com/ |
"प्रकाश पोळ" हे मराठीतील एक प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. ते सह्याद्री बाणा नावाचा ब्लॉग चालवितात. प्रकाश पोळ हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा मानणारे असून डो. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
प्रकाश पोळ यांचा ब्लॉग[संपादन]
बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक उन्नतीसाठी प्रकाश पोळ यांनी ’सह्याद्री बाणा’च्या माध्यमातून पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार केला आहे. बहुजन समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अतिरेकी धार्मिक दृष्टिकोन, कर्मकांड या समस्या दूर करण्यासाठी प्रकाश पोळ यांनी ब्लॉगची प्रभावी मांडणी केली आहे. महापुरुषांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी जवळजवळ अडीचशे लेख लिहिले आहेत. त्यांच्या ब्लॉगला ९ लाख वाचकांनी भेट दिली आहे. सह्याद्री बाणाचे ३७४ फॉलोअर असून जगभरातील ११३ देशांमधून हा ब्लॉग वाचला जातो. अल्पावधीतच हा ब्लॉग अतिशय लोकप्रिय झाला असून मराठी ब्लॉगर मधील मोजक्याच लोकप्रिय ब्लॉगमध्ये सह्याद्री बाणाचा समावेश होतो. डिसेंबर २०२०ला या ब्लॉगला १० वर्षे पूर्ण होतील. सह्याद्री बाणा हा मराठीमधील अत्यंत लोकप्रिय ब्लॉगपैकी एक आहे. बहुजनवादी चळवळीतील कार्यकर्ते आणि जगभरातील मराठी वाचकांनी या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळेच सह्याद्री बाणा हा लोकप्रिय ब्लॉग बनला आहे. अर्थातच यात पुरोगामी कार्यकर्ते आणि सह्याद्री बाणाचे वाचक यांचा सिंहाचा वाटा आहे.
प्रभाव[संपादन]
प्रकाश पोळ यांच्या विचारांवर राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, हरी नरके, संजय सोनवणी, डॉ. आ.ह. साळुंखे, या विचारवंतांचा प्रभाव आहे.
लेखन[संपादन]
प्रकाश पोळ हे पत्रलेखक आहेत. दै. लोकसत्ता, दै. सकाळ, दै.लोकमत, दै.पुढारी, दै.महाराष्ट्र टाईम्स, प्रीतिसंगम, दै. ग्रामोद्धार, दै.पुण्यनगरी अशा वर्तमानपत्रातून व नियतकालिकांतून त्यांची जवळजवळ ३०० पत्रे आणि काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध सामाजिक विषयावर ते नियमित लिहित असतात. पुरोगामी चळवळीसाठी त्यांनी प्रभावी मांडणी केली आहे. सह्याद्री बाणा या लोकप्रिय ब्लॉगवरून त्यांनी आजवर ३०० च्या वर लेख लिहिले आहेत.