पोपुरी ललिता कुमारी
पोपुरी ललिता कुमारी | |
---|---|
टोपणनाव | वोल्गा |
जन्म |
२७ नोव्हेंबर, १९५० गुंटूर, आंध्र प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पोपुरी ललिता कुमारी या तेलगू कवयित्री आणि लेखिका आहेत. त्या वोल्गा या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. त्या त्यांच्या स्त्रीवादी दृष्टीकोनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म गुंटूर, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला. इ.स. २०१५ मध्ये त्यांच्या तेलगूमधील 'विमुक्त कधा संपुती' या लघुकथा संकलनासाठी त्यांना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. लेखिका असण्यासोबतच त्या टॉलीवूडमध्ये प्रोफेसर आणि स्क्रिप्टिंग विभागाच्या प्रमुख देखील आहेत. त्यांच्या कार्याने स्त्रीवादाबद्दल देशभरात संवाद सुरू केले. त्या काळात ही कल्पना फारशी स्वीकारली जात नव्हती. द लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये त्यांच्या सर्वात लोकप्रिय प्रकाशित कामांचा संग्रह आहे. ज्यात निवडक कथांच्या इंग्रजी अनुवादांचा समावेश आहे.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण[संपादन]
वोल्गा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५० रोजी गुंटूर येथे झाला. त्यांनी १९७२ मध्ये आंध्र विद्यापीठातून तेलुगू साहित्यात एमए पूर्ण केले.
कारकीर्द[संपादन]
एमए नंतर व्होल्गा १९७३ ते १९८६ या कालावधीत व्हीएसआर आणि एनव्हीआर कॉलेज[१] तेनाली येथे तेलुगू प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. नंतर त्यांनी १९८६ - १९९५ दरम्यान उषाकिरण मूव्हीजमध्ये वरिष्ठ कार्यकारी म्हणून स्क्रिप्टिंग विभागात काम केले. नंतर १९९१ मध्ये त्या अस्मिता रिसोर्स सेंटर फॉर वुमन या तेलंगणा-आधारित स्वयंसेवी संस्थेत सामील झाल्या. सध्या त्या या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाच्या तेलुगू सल्लागार परिषदेच्या सक्रिय सदस्य असमिता संस्थेच्या संपादकीय, वामतिंती मासी (स्वयंपाकघरातील काजळ) या प्रकाशनाच्याही त्या सदस्या आहेत.
साहित्यिक कारकीर्द[संपादन]
व्होल्गा त्यांच्या स्त्रीवादी साहित्यकृतींसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्या, लेख, कविता आधुनिक, पुरोगामी विचारसरणीच्या स्त्रियांचे चित्रण करतात. त्यांनी कामाचा दर्जा राखताना पात्रांचे वास्तव अबाधित राखले आहे. त्यांच्या सर्व कादंबऱ्या त्या पूर्णवेळ कर्मचारी असताना लिहिल्या आहेत. त्यांची पहिली कादंबरी सहजा १९८६ मध्ये प्रकाशित झाली. ती कादंबरी काही काळासाठी वृत्तपत्रांमधील स्तंभांमध्ये चर्चेचा विषय होता. लगेच पुढच्या वर्षी, १९८७ साली त्यांची दुसरी कादंबरी स्वेच्छा प्रकाशित झाली. या दोन कादंबऱ्या विवाहित स्त्रीला कशा प्रकारे बांधून ठेवतात आणि तिच्या स्वातंत्र्याला बेड्या घालतात हे सांगतात.
साहित्यिक कामे[संपादन]
ललिता कुमारी यांनी सुमारे ५० प्रकाशनांचे लेखन आणि अनुवाद केले आहेत. सर्वात लोकप्रिय खाली सूचीबद्ध आहेत:
वर्ष | नाव | कामाचा प्रकार | नोट्स |
---|---|---|---|
१९८३ | अथदु, आमे, मनाम | साहित्यिक टीका | राष्ट्रवादी संघर्षावरील उप्पला लक्ष्मण राव यांच्या कादंबरीचा आढावा |
१९८४ | ऍग्नेस स्मेडलीच्या कथा | तेलुगु मध्ये भाषांतर | |
१९८५ | डॉटर ऑफ अर्थ | तेलुगु मध्ये भाषांतर | |
१९८६ | सहजा | कादंबरी | |
१९८७ | स्वेच्छा | कादंबरी | |
१९८८ | कन्नेति केरातला वेनेला | कादंबरी | |
१९८९ | थ्री जनरेशन्स | तेलुगु मध्ये भाषांतर | अलेक्झांड्रा कोलोंटाई यांची लघुकथा |
१९८९ | मानवी | कादंबरी | |
१९८९ | माकु गोडालु लेवु | संपादित कार्य | निबंध संग्रह |
१९९० | लेटर टू अ चाईल्ड नेव्हर बॉर्न | तेलुगु मध्ये भाषांतर | ओरियाना फॅलासीची कादंबरी |
१९९० | आकसलो सगम | कादंबरी | |
१९९२ | राजकिया कथलु | लघुकथा संग्रह | |
१९९३ | गुलाबबेलू | कादंबरी | |
१९९३ | नीली मेघालू | संपादित कार्य | |
१९९४ | नुरेला चालम | संपादित कार्य | १९९४ मध्ये ज्यांची शताब्दी साजरी करण्यात आली त्या चालम यांच्या कार्यावरील गंभीर निबंध |
१९९४ | सरसं | सह-संपादित कार्य | आंध्र प्रदेशातील महिलांच्या दारूविरोधातील संघर्षाचा अहवाल. |
१९९४ | विडोज | तेलुगु मध्ये भाषांतर | एरियल डॉर्फमनची कादंबरी |
१९९५ | सरिहद्दुलु लेनी समध्यालु | सह-संपादित कार्य | निबंध संग्रह |
१९९५ | प्रयोगम | लघुकथा संग्रह | |
१९९५ | वल्लू आरुगुरु | नाटक | |
२००१ | चरित्र स्वरालु | नाटक | |
माहीत नाही | पॉइंट झिरो येथे महिला | तेलुगु मध्ये भाषांतर | नवाल अल सादवी यांची अरबी कादंबरी |
पुरस्कार आणि सन्मान[संपादन]
वर्ष | शीर्षक | श्रेणी | नोट्स |
---|---|---|---|
१९८७ | स्वेच्छा | सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार | |
१९९० | आकसलो सगम | सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार | |
१९९३ | स्वेच्छा | महिलांच्या कार्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ओळख म्हणून पुरस्कार | |
१९९८ | तोडू | नंदी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट कथा लेखक) | आंध्रप्रदेश सरकारने पुरस्कार दिला. |
१९९९ | - | सर्वोत्कृष्ट महिला लेखिका | तेलुगु विद्यापीठाने पुरस्कार दिला |
२००९ | - | सुशीला नारायण रेड्डी पुरस्कार | |
२०१३ | - | कंदुकुरी वीरसालिंगम साहित्य पुरस्कार | |
२०१४ | - | लोकनायक फाउंडेशन पुरस्कार [२] | |
२०१५ | विमुक्त | साहित्य अकादमी पुरस्कार |
संदर्भ[संपादन]
- ^ "VSR & NVR College". vsrnvr.ac.in. 21 April 2018 रोजी पाहिले.
- ^ "Loknayak Foundation". www.loknayakfoundation.com. 21 April 2018 रोजी पाहिले.
- http://vsrnvr.ac.in/nvr/tel.html
- http://www.bhaavana.net/volga/ids/volga.html
- http://www.newindianexpress.com/cities/hyderabad/People-Were-Angry-With-my-Writing-Volga/2015/12/19/article3184504.ece1
- http://www.newindianexpress.com/cities/hyderabad/Feminist-Volga-Wins-Sahitya-Akademi-Award/2015/12/18/article3183580.ece
- https://www.loc.gov/acq/ovop/delhi/salrp/kumari.html