पॉल डुमेर
French statesman (1857–1932) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | मार्च २२, इ.स. १८५७ Aurillac | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | मे ७, इ.स. १९३२ पॅरिस | ||||
| मृत्युची पद्धत |
| ||||
| मृत्युचे कारण |
| ||||
| मारेकरी |
| ||||
| चिरविश्रांतीस्थान |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| सदस्यता |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद |
| ||||
| पद |
| ||||
| वडील |
| ||||
| अपत्य |
| ||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| कर्मस्थळ | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
जोसेफ अथानेझ डुमेर तथा पॉल डुमेर (२२ मार्च, १८५७ – ७ मे, १९३२) हे जून १९३१ पासून मे १९३२ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना वर्णन "फ्रेंच इंडोचायनाचे जनक" आणि इंडोचायनाचे सर्वात सक्रिय आणि प्रभावी गव्हर्नर जनरल समजले जाते.[१]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]डुमेर यांचा जन्म २२ मार्च १८५७ रोजी फ्रांसमधील ऑरियाक येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी १८७७ मध्ये मेंदे येथे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.[२]
१८७८ मध्ये डुमेर यांनी ब्लांश रिशेल यांच्याशी लग्न केले. त्यांना आठ मुले होती, ज्यांपैकी चार मुले पहिल्या महायुद्धात मारली गेली.
कारकीर्द
[संपादन]१८७९ ते १८८३ या काळात डुमेर यांनी रेमिरेमाँ येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी कुरियर डी ल'एसने या प्रादेशिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. १८९२ मध्ये ते ग्रँड ओरिएंट डी फ्रांस या फ्रीमेसन संस्थेचे महासचिव झाले.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात १८८५ मध्ये झाली. १८८८ मध्ये डुमेर एसने विभागातून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. १८९५-९६ मध्ये त्यांनी फ्रांसचे अर्थमंत्री म्हणून अल्पकाळ काम पाहिले. या दरम्यान त्यांनी आयकर लागू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.[३]
१८९७ ते १९०२ या काळात डुमेर फ्रेंच इंडोचायनाचे गव्हर्नर जनरल होते. त्यांनी अफू, मद्य आणि मिठाच्या व्यापारावर कर लावून वसाहतीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. त्यांनी हॅनोई शहरात लाँग बिएन पुलासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि फ्रेंच वसाहती धाटणीच्या इमारतींचे बांधकाम केले.[४]
फ्रांसला परतल्यानंतर १९०२ ते १९०५ या काळात त्यांनी चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९२७ ते १९३१ या काळात ते फ्रेंच सेनेटचे अध्यक्ष होते. १३ मे १९३१ रोजी त्यांची फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.[५]
हत्या
[संपादन]६ मे १९३२ रोजी पॅरिसमधील एका पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पॉल गॉर्ग्युलोफ या रशियन स्थलांतरिताने डुमेर यांच्यावर गोळ्या झाडल्या. ७ मे १९३२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. हत्येचा खटला चालवून चार महिन्यांनंतर गॉर्ग्युलोफला गिलोटीनद्वारे मृत्युदंड देण्यात आला.[६]
लेखन
[संपादन]लेखक म्हणून त्यांची ल इंडो-चीन फ्रांसेस (१९०४) आणि ले लिव्ह्रे डी मेस फिल्स (१९०६) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
- ↑ Logan, William Stewart (2000). Hanoi: Biography of a City (इंग्रजी भाषेत). UNSW Press. p. 76. ISBN 978-0-86840-443-1.
- ↑ Sasges, Gerard (2017-09-30). Imperial Intoxication: Alcohol and the Making of Colonial Indochina (इंग्रजी भाषेत). University of Hawaii Press. p. 52. ISBN 978-0-8248-6691-4.
- ↑ "Paul Doumer | French politician, governor-general, assassination | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2026-03-22 रोजी पाहिले.
- ↑ Ladenburg, Thomas. "The French in Indochina" (PDF). digitalhistory.uh.edu. University of Houston. 2026-03-22 रोजी पाहिले.
- ↑ "Paul Doumer Becomes President Of France". United Press. June 14, 1931. 2026-03-22 रोजी पाहिले.
- ↑ Lorin, Amaury (2011). "Un « régicide républicain » : Paul Doumer, le président assassiné (6 mai 1932)". Criminocorpus (फ्रेंच भाषेत). 2026-03-22 रोजी पाहिले.