पेरूचा पापा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.पेरूचा पापा ही मुंबईकरांना माहीत असलेली नित्यनियमाची गोष्ट होती. उपनगरांत राहत असलेले हे चाकरमानी रोज सकाळी हा पापा घेऊनच मुंबई शहरातील कार्यालयासाठी प्रस्थान करीत असत. मराठी कथालेखक व.पु. काळे यांनी सर्वात आधी 'पेरूचा पापा' शोधून काढला आणि नंतर तो घरोघरी पोचला. यांतला पे म्हणजे (फाऊंटन)पेन, रू म्हणजे रुमाल, चा म्हणजे चाव्या, आणि उरलेले दोन पा म्हणजे पास आणि (पैशाचे) पाकीट. कोणतीशी एक ठरावीक लोकल पकडून दक्षिण मुंबईत असलेल्या ऑफीसला जाणाऱ्याला ती गाडी चुकू नये यासाठी घरापासून धावाधाव करावी लागत असे. त्या गडबडीत एकादी महत्त्वाची वस्तू विसरून घरी राहिली तर सगळा गोंधळ व्हायचा. तो टाळण्यासाठी त्या सर्व वस्तूंना एकत्र बांधणारे 'पेरूचा पापा' हे दिव्य सूत्र वपूंनी मराठी माणसाला दिले होते.

पुढे तऱ्हेतऱ्हेच्या बॉलपेनांचा आणि फायबर टिप पेनांचा महापूर आला आणि फाऊंटन पेन कालबाह्य झाले. ऑफिसे घरापासून बसच्या किंवा पायी चालण्याच्या अंतरावर आली, त्यामुळे पास नाहीसा झाला आणि पाकिटाची गरज कमी झाली. रुमाल व चावी एवढ्या दोनच गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सूत्राची गरज राहिली नाही आणि त्यातून त्यातली एखादी विसरून राहून गेली तरी वाटेतून केव्हाही परत फिरून त्या घेऊन जाणे शक्य होते. त्यामुळे 'पेरूचा पापा' मागे पडला.

नवीन जमान्यामध्ये पाकिटाऐवजी क्रेडिट कार्ड आणि मोबाईल आला आणि काही लोकांनी 'पेरूच्या पापा'ऐवजी 'मोरूचा काका' (अर्थात मोबाईल, रुमाल, चावी आणि क्रेडिट कार्ड) लक्षात ठेवायला सुरुवात केली.

नंतरच्या काळात कॅलिफोर्नियाचे कोंकण करण्यासाठी मराठी माणसे अमेरिकेत जाऊ लागली. इतर अमेरिकनांप्रमाणे हेही आपल्या मोटारीने ऑफीसला जातात. त्यासाठी (ड्रायव्हिंग) लायसेन्स सोबत ठेवणे अनिवार्य असते. रोख पैशातले व्यवहार जवळ जवळ संपुष्टात येऊन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने सारे व्यवहार व्हायला लागले. रुमालाचा वापर कमी होऊन त्याच्या जागी 'वाईप्स' (कागदी रुमाल) आले. या गोष्टींची आद्याक्षरे घेऊन 'मोलाचा कावा' असा नवा मंत्र तयार झाला. (मोबाईल, लायसन्स, चावी, कार्ड आणि वाईप्स.)

अमेरिकेत मुरलेली मराठी माणसे मोबाईलला सेल फोन म्हणतात, त्यामुळे मोबाईल शब्द गळाला. आता नवे सूत्र आहे Cellphone, Licence, I card, Credit card आणि Key यांची इंग्रजी मुळाक्षरे घेऊन केलेले क्लिक (CLICK).