पॅराडाईज पेपर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख एका सद्य घटनेबद्दल आहे. जसजशी माहिती उपलब्ध होईल तसतसा येथील मजकूर बदलण्याची शक्यता आहे.


पॅराडाईज पेपर्स घोट्याळ्यात लिप्त देश

पॅरेडाइझ पेपर्स ही जर्मनीच्या सुडडॉइच झाइटुंग या वृत्तपत्राने उघडकीस आणलेली कागदपत्रे आहेत. याद्वारे काही बोगस कंपन्या जगभरातील धनाढ्य लोकांचा काळा पैसा विदेशात पाठविण्यास मदत करीत आहेत असे प्रतिपादन या वृत्तपत्राने केले आहे. [१][२]

९६ मीडिया संस्थांच्या मदतीने इंटरनॅशनल कॉन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने (आय सी आय जे) पॅराडाईज पेपर्स असे नाव दिलेल्या दस्तावेजांची छाननी केली. हे असे एकूण १.३४ कोटी दस्तावेज आहेत.

विशेष म्हणजे, सुमारे १८ महिन्यांपूर्वी जर्मनीच्या याच वृत्तपत्राने पनामा पेपर्स या मथळ्याखाली एक घोटाळा उघड केला होता.[१]

या शोधपत्रकारीतेत, पत्रकारांच्या एका पथकाने बर्म्युडाच्या 'ली फर्म ॲपलबॉय'चे दस्तावेज तपासले.यात अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या अन्य देशांसमवेत काही भारतीय कंपन्याही आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b c पॅराडाईज पेपर्स : जगभरातील अनेक बड्या नावांचा समावेश.
  2. ^ 714 Indians in Paradise Papers. ०७/११/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)