पॅटी ड्यूक
American actress (1946–2016) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Patty Duke |
---|---|
जन्म तारीख | डिसेंबर १४, इ.स. १९४६ क्वीन्स (न्यू यॉर्क सिटी) Anna Maria Duke |
मृत्यू तारीख | मार्च २९, इ.स. २०१६ (६९) कॉइर द अलेन |
मृत्युची पद्धत |
|
मृत्युचे कारण |
|
चिरविश्रांतीस्थान |
|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
कार्य कालावधी (अंत) |
|
नागरिकत्व | |
व्यवसाय |
|
पद |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
[ अधिकृत संकेतस्थळ] | |
ॲना मेरी "पॅटी" ड्यूक (१४ डिसेंबर १९४६ [१] - २९ मार्च २०१६) एक अमेरिकन अभिनेत्री होती. तिच्या अभिनय कारकिर्दीत, तिला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळाले होते.
वयाच्या १५ व्या वर्षी, ड्यूकने द मिरॅकल वर्कर (१९६२) या चित्रपटात हेलन केलरची भूमिका केली. हीच भूमिका तिने आधी ब्रॉडवेवर साकारली होती. तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला ज्यात ॲन बँक्रॉफ्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तिच्या ॲन सलिव्हानच्या भुमिकेसाठी. पुढच्या वर्षी, तिने तिच्या स्वतःच्या नेटवर्क दूरचित्रवाणी मालिका द पॅटी ड्यूक शो (१९६३-१९६६) मध्ये जुळे कॅथी आणि पॅटी लेनची दुहेरी भूमिका साकारली. व्हॅली ऑफ द डॉल्स (१९६७) या चित्रपटातील नीली ओ'हारा आणि मी, नॅताली (१९६९) चित्रपटातील नॅताली मिलर यासारख्या अधिक परिपक्व भूमिकांकडे तिने प्रगती केली. मी, नॅताली साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. १९८५ ते १९८८ पर्यंत तिने स्क्रीन ॲक्टर्स गिल्डच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[२]
ड्यूक यांना १९८२ मध्ये द्विध्रुवीय विकार असल्याचे निदान झाले. तिच्या निदानानंतर, तिने आपला बराचसा वेळ लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी वकिली करण्यात आणि शिक्षित करण्यासाठी दिला. ती अधूनमधून गायिका आणि लेखिकाही होती.
प्रारंभिक जीवन
[संपादन]ड्यूकचा जन्म मॅनहॅटनमधील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये झाला.[३] फ्रान्सिस मार्गारेट (कॅशियर) आणि जॉन पॅट्रिक ड्यूक (हॅन्डीमन आणि कॅब ड्रायव्हर) यांच्या तीन मुलांपैकी ही सर्वात लहान होती.[४][५] तिचे पालनपोषण रोमन कॅथोलिक झाले.[६]
ड्यूकने तिचे सुरुवातीचे आयुष्य क्वीन्सच्या एल्महर्स्ट परिसरात घालवले, [३] जिथे तिचा भाऊ रेमंड, तिची बहीण कॅरोल आणि तिने कठीण बालपण अनुभवले. त्यांचे वडील मद्यपी होते आणि त्यांच्या आईला क्लिनिकल नैराश्याने ग्रासले होते आणि ती हिंसक होत असे. ड्यूक सहा वर्षांचा असताना, तिच्या आईने तिच्या वडिलांना कुटुंब सोडण्यास भाग पाडले. जेव्हा ड्यूक आठ वर्षांचा होता, तेव्हा तिची काळजी जॉन आणि एथेल रॉस यांच्याकडे सोपवली गेली, जे बाल कलाकारांच्या शोधात होते.[७][८]
ड्यूकच्या कारकिर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या रॉसेसच्या पद्धती अनेकदा बेईमान आणि शोषणात्मक होत्या. त्यांनी सातत्याने ड्यूकला तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असल्याचे दाखवले आणि तिचा माहितीपत्रात अनेक खोट्या माहिती दिल्या.[९] त्यांनी तिला मद्य आणि अमली पदार्थ दिले, तिच्या कमाईतून अवास्तव जास्त मोबदला घेतला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.[८] ती क्वचित तिच्या आईला भेटत असे.[१०] याव्यतिरिक्त, रॉसेसने ड्यूकला तिचे नाव बदलायला लावले व अभिनेत्री पॅटी मॅककॉर्मॅकच्या नावावरून "पॅटी ड्यूक" असे नाव आले.[८][११]
वैयक्तिक जीवन
[संपादन]ड्यूकचे चार वेळा लग्न झाले होते आणि त्याला तीन मुले होती. कॅथोलिक, ड्यूकला तिच्या तारुण्यात नन बनण्याची इच्छा होती.[१२] [१३] तिच्या नंतरच्या आयुष्यात, तिने अनेक वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला, जसे की बौद्ध धर्म, यहुदी धर्म.[६]
१९६५ मध्ये, ड्यूकने दिग्दर्शक हॅरी फॉकशी लग्न केले, जे तिच्यापेक्षा १३ वर्षे ज्येष्ठ होते. यामुळे ड्यूकचे तिच्या बालपणीचे पालक, रोसेस यांच्याशी असलेले नाते संपुष्टात आले.[१०] १९६९ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.[७]
१९७० च्या सुरुवातीस, वयाच्या २३ व्या वर्षी, ड्यूक एकाच वेळी तीन पुरुषांसोबत संबंधीत झाली — १७ वर्षीय देसी अर्नाझ जुनियर,[७] अभिनेता जॉन अस्टिन, जो तिच्यापेक्षा १६ वर्षे ज्येष्ठ होता, आणि रॉक संगीत प्रवर्तक मायकेल टेल.[१४][१५]
जून १९७० मध्ये, ड्यूकला कळले की ती गर्भवती आहे; त्यानंतर तिने २६ जून १९७० रोजी मायकेल टेल याच्याशी विवाह केला.[१४] त्यांचा विवाह ९ जुलै १९७० रोजी रद्द होण्यापूर्वी १३ दिवस टिकला.[७] तिचा मुलगा, अभिनेता शॉन अस्टिन याचा जन्म २५ फेब्रुवारी १९७१ रोजी झाला. तिने नंतर शॉनला सांगितले की अर्नाझ जुनियर हे शॉनचे जैविक पिता होते.[१४] पण ड्यूकने तिच्या १९८७ च्या आत्मचरित्रात म्हणले आहे की ॲस्टिन हा शॉनचा वास्तविक जैविक पिता होता. पण १९९४ मध्ये, जेव्हा शॉनने जैविक चाचणी घेतली, तेव्हा परिणामांवरून दिसून आले की टेल त्याचे जैविक पिता होते.[१६][१७][१५]
ड्यूकने ५ ऑगस्ट १९७२ रोजी जॉन ॲस्टिनशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगा, अभिनेता मॅकेन्झी ॲस्टिन झाला.[१८] १९८५ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.
ड्यूकने १९८६ मध्ये तिच्या चौथ्या पती, ड्रिल सार्जंट मायकेल पियर्सशी लग्न केले आणि ३० वर्षांपर्यंत तिच्या मृत्यूपर्यंत त्याची पत्नी राहिली.[१९]
२९ मार्च २०१६ रोजी सकाळी ६९ व्या वर्षी फुटलेल्या आतड्यातून सेप्सिसने ड्यूकचा मृत्यू झाला.[२०][२१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Patty Duke". Television Academy.
- ^ Duke, Patty; Kennen Turan (1987). Call Me Anna: The Autobiography of Patty Duke. Bantam Books. p. 8. ISBN 0-553-27205-5.
- ^ a b "Oscar-winning actress Patty Duke dies at 69". Orange County Register. March 29, 2016. August 24, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 24, 2020 रोजी पाहिले.
- ^ Eberly, Stephen L. (1988). Patty Duke. Bloomsbury Academic. ISBN 9780313256752.
- ^ "Patty Duke becomes an Irish citizen". Daily Express. March 13, 2013. February 26, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ a b Dawidziak, Mark (April 1, 1995). "Patty Duke Hopes New Series Will Promote Spirituality". The Roanoke Times. p. S-1. February 26, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ a b c d Lipton, Michael A. (May 3, 1999). "Duke of Hazards; Having Survived a Hellish Youth and Manic Depression, Patty Duke Relishes Her Rustic Life Down on the Farm". People. 51 (16). June 2, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 15, 2009 रोजी पाहिले.
- ^ a b c Yahr, Emily (March 29, 2016). "Patty Duke: The original survivor of dysfunctional child stardom". The Washington Post (इंग्रजी भाषेत). ISSN 0190-8286. March 30, 2016 रोजी पाहिले.
- ^ Vancheri, Barbara (April 27, 1999). "Patty Duke pairs off again as 'identical cousins'". Pittsburgh Post-Gazette. pp. D 1, D 8. September 16, 2022 रोजी पाहिले – Newspapers.com द्वारे.
- ^ a b Eberly, Stephen L. (1988). Patty Duke : a bio-bibliography. New York: Greenwood Press. ISBN 0-313-25675-6. OCLC 17383672.
- ^ "Biography". Officialpattyduke.com. August 4, 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 4, 2010 रोजी पाहिले.
- ^ Heffron, Christopher (January 14, 2015). "One-on-One with Patty Duke". August 6, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 20, 2019 रोजी पाहिले.
- ^ "R.I.P. Patty Duke, Catholic". March 29, 2016. November 7, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 10, 2019 रोजी पाहिले.
- ^ a b c Duke, Patty; Kennen Turan (1987). Call Me Anna: The Autobiography of Patty Duke. Bantam Books. p. 231. ISBN 0-553-27205-5.
- ^ a b "How Patty Duke's Son Sean Astin Learned Who His Biological Father Is". Peoplemag.
- ^ Barrett, Victoria (December 19, 2003). "'I don't want to play the fat guy or the friend all my life' (interview with Sean Astin)". The Guardian. London. August 15, 2009 रोजी पाहिले.
- ^ "Local Publisher's Son in Spotlight". Las Vegas Review Journal. February 29, 2004. August 15, 2009 रोजी पाहिले.
- ^ "Patty Duke Dead: 'Miracle Worker' Star Was 69". The Hollywood Reporter. March 29, 2016. March 30, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Oscar-winning former child star Patty Duke dies, age 69". USA TODAY. March 30, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Patty Duke Is Dead at 69". abcnews.com. March 29, 2016 रोजी पाहिले.
- ^ Puente, Maria (March 29, 2016). "Oscar-winning former child star Patty Duke dies, age 69". USA Today. March 29, 2016 रोजी पाहिले.