शुकदास महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


स्वामी शुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या गावाला विवेकानंदनगर म्हणून विकसित करणारे एक कर्मयोगी होते.

त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथे एका शिक्षणनगरीची निर्मिती केली.

येथील संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक काढून विविध प्रकल्प पूर्ण केले. त्याबरोबरच एक धार्मिक वारसा जपण्याचा व तो पुढील पिढीला सोपवण्याचा एक वसा स्वामी शुकदासांनी घेतला. आपल्या कृतीने त्यांनी तो पूर्णत्वासही नेला. हजारो विद्यार्थी हा वसा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव उज्ज्वल करताना दिसत आहेत. हा स्वामीजींच्या एकूण कार्याचाच परिपाक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त हिवरा आश्रम या गावाला यात्रेनिमित्त जनसागर उसळलेला असतो.