पूंछ नदी
river in India and Pakistan | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | जम्मू आणि काश्मीर (राज्य), पाकव्याप्त काश्मीर, भारत, पाकिस्तान | ||
लांबी |
| ||
नदीचे मुख | |||
Drainage basin |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
पूंछ नदी (ज्याला पंच नदी, पंच तोही, पुलस्त असेही म्हणतात)[१][a]ही झेलम नदीची एक उपनदी आहे जी भारतातील जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तानमधील आझाद काश्मीरमधून वाहते.
भाषाशास्त्रज्ञ जॉर्ज बुहलर यांच्या मते, "तोही" या शब्दाचे प्राचीन रूप "तौशी" आहे ज्याचा उल्लेख राजतरंगीणी आणि नीलमत पुराणात आढळतो.[२] नंतरच्या लिखाणात, आपगा (सियालकोटचा नाला), तौशी आणि चंद्रभागा ही नावे एकत्रितपणे दिसतात. कदाचित, हा शब्द संस्कृत तुषार, (थंड, म्हणजेच बर्फ) सोबत संबंधित असावा.
ही नदी पीर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेकडील पायथ्याशी, नील-कंठ गली आणि जामियान गली या भागात उगम पावते. या भागात त्याला सिरण किंवा सुरण म्हणतात. ती दक्षिणेकडे आणि नंतर पश्चिमेकडे वाहते आणि पूंछ शहरात पोहोचते. त्यानंतर ती नैऋत्येकडे वळते आणि शेवटी चोमुखजवळील मंगला धरणाच्या जलाशयामध्ये वाहते. या नदीच्या काठावर पूंच, सेहरा, तट्टा पानी, कोटली आणि मीरपूर ही शहरे वसलेली आहेत.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ Kashmir under the Sultans, 1959
- ^ Georg Bühler (1877), Detailed Report of a Tour in Search of Sanskrit Mss. made in Kasmir, Rajputana, and Central India, Bombay: Society's Library, Town Hall. London: Trübner & Co., p. 3
- ^ Himalayan Rivers, Lakes, and Glaciers, 1991
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.