पु.ल. देशपांडे यांचे भाषाप्रभुत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

पु.ल. देशपांडे यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. मंगला गोडबोले यांच्या 'पु.ल. वांदणे स्मरणाचे' या पुस्तकातला हा किस्सा :-

सन १९६०-६१च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घॆतली होती. त्यातील संवाद पहा -

वसंत सबनीस : "आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होतात. हीच वरात तुम्ही आता वाऱ्यावर सोडली आहे, हे खरे आहे का?"

पु.लं. : "वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो! भावगीत गायक झालो तो काळ 'वारा फोफावला'चा होता! नट झालो नसतो तर वारावर जेवायची पाळी आली असती. शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा वारा प्यायलो होतो. संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत वारा भरून सूर काढत होतो. नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार आवारा होतो. प्राध्यापक झालो तॆव्हा विद्वत्तेचा वारा अंगावरून गेला होता. पटकथा लिहिल्या त्या वाऱ्यावर उडून गेल्या. नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी वाऱ्याला उभं नसतं राहिलं!

ही सर्व सोंगं करताना फक्त एकच खबरदारी घेतली, ती म्हणजे कानात वारं शिरू न देण्याची. आयुष्यात अनेक प्रकारच्या वाऱ्यांतून हिंडलो, त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले त्यांचीच आता वरात काढली. लोक हसतात. माझ्या डोळयात आतल्या आत कृतज्ञतेचे पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा वारा लागत नाही."

पुलंना उभा महाराष्ट्र साष्टांग दंडवत घालतो ते उगाच नाही.