पुष्पा गिरिमाजी
Indian journalist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
नागरिकत्व | |||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |

पुष्पा गिरिमाजी ह्या एक लेखिका, पत्रकार, ग्राहक हक्क स्तंभलेखिका आणि ग्राहक सुरक्षेच्या समर्थक आहेत. त्या एकमेव भारतीय पत्रकार आहेत ज्यांनी तीन दशकांहून अधिक काळ सतत साप्ताहिक ग्राहक स्तंभ लेखन केले आहे.
गिरिमाजींनी १९७६ मध्ये बंगळूर येथून प्रकाशित होणाऱ्या 'सिटी टॅब' या वृत्तपत्रातून आपल्या पत्रकारितेतील कारकिर्दीला सुरुवात केली. सिटी टॅब नंतर, त्यांनी १९८२ मध्ये बंगळुरूमध्ये डेक्कन हेराल्डमध्ये आणि तदनंतर दिल्ली येथून द इंडियन एक्सप्रेसमध्ये काम केले. १९८३ मध्ये, गिरीमाजी यांनी आपला स्वतःचा ग्राहक स्तंभ आणि त्याचे सिंडिकेशन सुरू केले, जे पुढील वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले: द टाइम्स ऑफ इंडिया, गुजरातमधील दिव्य भास्कर, अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, आणि संयुक्त कर्नाटक व विजया कर्नाटक, दोन्ही ठिकाणी कन्नड भाषेतून.
२००० ते २००३ पर्यंत त्या विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्य होत्या आणि अनेक नियमांच्या मसुद्यात, विशेषतः पॉलिसीधारकांच्या हिताच्या संरक्षणावरील नियमनात त्या पूर्णपणे सहभागी होत्या. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आणि कायद्यातील असंख्य सुधारणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[१]
ग्राहक सुरक्षेच्या क्षेत्रात गिरीमाजी यांच्या कामाची दखल घेऊन, अमेरिकेतील अंडररायटर्स लॅबोरेटरीने त्यांना आपल्या ग्राहक सल्लागार परिषदेचे सदस्य बनवले आहे.[२]
गिरीमाजी यांना त्यांच्या व्यावसायिक कार्यासाठी कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, संस्कृती पुरस्कार, एमआरपै पुरस्कार आणि चमेलीदेवी जैन पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.[३]
८ मार्च २०१८ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २०१७ सालचा नारी शक्ती पुरस्कार पुष्पा गिरिमाजी यांना प्रदान केला.[४][५]
सध्या, गिरीमाजी ह्या दर आठवड्याला दोन खास कॉलम लिहितात - एक हिंदुस्तान टाइम्ससाठी आणि दुसरा द ट्रिब्यूनसाठी.
पुरस्कार
[संपादन]- ग्राहक संरक्षण क्षेत्रात अग्रगण्य पत्रकारिता कार्यासाठी एमआरपाई मेमोरियल पुरस्कार, जुलै २००५.[३]
- पत्रकारितेद्वारे सार्वजनिक सेवेसाठी २००१ मध्ये कर्नाटक राज्य सरकारचा पुरस्कार (कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार).[३]
- "ग्राहक जागरूकता आणि संरक्षणासाठी समर्पित पत्रकारिता कार्य" साठी १९९१ मध्ये उत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून चमेली देवी जैन पुरस्कार.[६]
- "ग्राहकांच्या समस्यांवर सातत्यपूर्ण लेखन" साठी १९९१ मध्ये मीडिया इंडिया पुरस्कार.[३]
- ग्राहक हक्कांच्या क्षेत्रातील कार्यासाठी १९८८ मध्ये अमेरिकन सोसायटी ऑफ न्यूजपेपर एडिटर्स फेलोशिप.[३]
- "पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी" १९८५ मध्ये संस्कृती पुरस्कार[३]
- नारी शक्ती पुरस्कार - २०१७ [५]
संदर्भग्रंथ
[संपादन]- कंझ्युमर राईट फॉर एव्हरीवन, खंड १ (१९९९),आयएसबीएन 9780140265323
- मिसलिडींग ॲडव्हर्टायझमेंट अँड द कस्टमर- खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी बनवलेल्या विविध कायद्यांच्या अकार्यक्षमतेवर एक मोनोग्राफ.
संदर्भ
[संपादन]- ^ "23-Member Irda Advisory Panel Appointed | Business Standard News". Business Standard India. business-standard.com. 26 May 2000. 2014-08-04 रोजी पाहिले.
- ^ "Pharma vigilance system vital - The Times of India". The Times of India. timesofindia.indiatimes.com. 20 January 2003. 2014-08-04 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f "GOVERNMENT OF INDIA | SECOND ADMINISTRATIVE REFORMS COMMISSION | TWELFTH REPORT" (PDF). 6 March 2009. 2014-07-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-08-04 रोजी पाहिले.
- ^ "president sacretariat". १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ a b "Ministry of Women and Child Development Nari Shakti ..." (PDF). १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ Agrawal, S. P. (1 Jan 1993). Development Digression Diary Of India: 3d Companion Volume To Information India 1991-92. Concept Publishing Company. p. 22. ISBN 9788170223054. 12 December 2014 रोजी पाहिले.