Jump to content

पुष्पक भट्टाचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पुष्पक भट्टाचार्य
जन्म ३ जुलै १९६२
मृत्यू ५ ऑक्टोबर २०२५
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे पीबी
पेशा संगणक-वैज्ञानिक, प्राध्यापक
संकेतस्थळ
https://www.cse.iitb.ac.in/~pb/


पुष्पक भट्टाचार्य (जन्म : ३ जुलै १९६२ -- मृत्यू : ५ ऑक्टोबर २०२५) हे संगणक-वैज्ञानिक तसेच भारतीय तंत्रज्ञान-संस्था (आयआयटी) मुंबई येथे प्राध्यापक होते. तसेच भारतीय तंत्रज्ञान-संस्था, पटना येथे ते २०१५ ते २०२१ ह्या कालावधीत संचालक पदावर कार्यरत होते.

प्रा. भट्टाचार्य हे भारतीय तंत्रज्ञान-संस्था, मुंबई (आयआयटी, मुंबई) येथील भारतीय भाषा-तंत्रज्ञान-केंद्राचे (CFILT) प्रमुख होते.