पुनर्वा
पुनर्वा किंवा चेना (द्विनाम: पॅनिकम मिलियासियम) हे एक भरड धान्य आहे. याची काही सामान्य नावे पुढील प्रमाणे आहेत: प्रोसो मिलेट, ब्रूमकॉर्न मिलेट, कॉमन मिलेट, हॉग मिलेट, कश्फी मिलेट, रेड मिलेट आणि व्हाईट मिलेट. पुरातत्वीय वनस्पतीशास्त्रीय पुराव्यांवरून असे दिसून येते की हे भरड धान्य प्रथम उत्तर चीनमध्ये सुमारे १०,००० वर्षांपूर्वी पिकवण्यात आले होते.[१] याची प्रमुख लागवड उत्तर चीन, भारतातील हिमाचल प्रदेश,[२] नेपाळ, रशिया, युक्रेन, बेलारूस, मध्य पूर्व, तुर्की, रोमानिया आणि अमेरिकेतील ग्रेट प्लेन्स राज्ये इत्यादी देशांमध्ये केली जाते.[३] या पिकाची दरवर्षी सुमारे ५,००,००० एकर (२,००,००० हेक्टर) लागवड केली जाते.[४] हे पीक अल्प मुदतीचे असून याच्या काही जाती लागवडीनंतर केवळ ६० दिवसांत काढणीस येतात.[५] याला पाण्याची फारशी आवश्यकता नसून, कमी आर्द्रते मध्ये देखील अधिक धान्य उत्पादन प्राप्त होते.[५][६]

या पिकावर हल्ला करणारे रोग आणि कीटक हे अल्प प्रमाणात असून ते फारसे हानिकारक देखील नाहीत. या पिकाची केवळ तण हीच एक मोठी समस्या आहे. या पिकाच्या बाल्यावस्थेतील विकासाचा टप्पा फार महत्वाचा आहे. दाण्यांची निर्मिती ३ ते ५ पानांच्या अवस्थेत होते. त्यानंतर, याच्या उत्पादनासाठी सर्व पोषक तत्व उपलब्ध व्हावी म्हणून तणांची वाढ रोखली जाते. पारंपारिक शेतीमध्ये, तणनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये, हात खुरपे, सायकल खुरपे किंवा इतर कल्टिव्हेटरचा वापर करता येतो.[७] चांगल्या पिकाच्या विकासासाठी, ५० ते ७५ किलोग्रॅम प्रति हेक्टर नायट्रोजनची शिफारस केली जाते.[८] मक्यानंतर लगेच या पिकाची लागवड करणे टाळावे. कारण या दोन्ही पिकातील तण हे एक सारख्याच प्रजातीचे असतात. ज्यामुळे तण वाढीची गंभीर निर्माण होऊ शकते. हे पीक विनासायास आणि कमी पाण्यात येत असल्याने रब्बीत याची लागवड सहज सोपी ठरते.[७]
अन्न आणि पेय म्हणून
[संपादन]
अमेरिकेत, हे भरड धान्य ग्लूटेन-मुक्त बिअर तयार करण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये इतर धान्यांसह मिसळून एक विशिष्ट पोत तयार केला जातो.[९][१०]
पशुधन आणि कुक्कुटपालन
[संपादन]हे पीक प्रामुख्याने पशुधन आणि कुक्कुटपालनासाठी जनावरांचा चारा म्हणून देखील पिकवले जाते. अन्न म्हणून त्यात लायसिनची कमतरता असते आणि त्याला पूरक आहाराची आवश्यकता असते. काही ठिकाणी याच्या ऐवजी राळे (फॉक्सटेल मिलेट), प्रमुख चारा म्हणून प्राधान्याने पिकवले जाते. याच्या पिठामध्ये ९% पाणी, ७५% कार्बोहायड्रेट्स, ११% प्रथिने आणि ४% चरबी असते (टेबल). प्रति १०० ग्रॅम पीठापासून ३८२ कॅलरीज प्राप्त होतात. याच सोबत हे धान्य बी जीवनसत्त्वे आणि आहारातील खनिजांचा समृद्ध स्रोत आहे.
स्थानिक नावे
[संपादन]लागवडीखालील क्षेत्रात प्रोसो बाजरीची स्थानिक नावे अशी आहेत:
संदर्भ
[संपादन]- ^ Lu, H.; Zhang, J.; Liu, K.-b.; et al. (21 April 2009). "Earliest domestication of common millet (Panicum miliaceum) in East Asia extended to 10,000 years ago". Proceedings of the National Academy of Sciences. 106 (18): 7367–7372. Bibcode:2009PNAS..106.7367L. doi:10.1073/pnas.0900158106. PMC 2678631. PMID 19383791.
- ^ Bhat, B Venkatesh; Arunachalam, A; Kumar, Dinesh; Tonapi, Vilas A; Mohapatra, Trilochan (2019). Millets in the Himalaya (PDF). Indian Council of Agriculgultural Research. pp. 28, 76. 2022-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ Habiyaremye, Cedric; Matanguihan, Janet B.; D'Alpoim Guedes, Jade; Ganjyal, Girish M.; Whiteman, Michael R.; Kidwell, Kimberlee K.; Murphy, Kevin M. (2017). "Proso Millet (Panicum miliaceum L.) and Its Potential for Cultivation in the Pacific Northwest, U.S.: A Review". Frontiers in Plant Science. 7: 1961. doi:10.3389/fpls.2016.01961. PMC 5220228. PMID 28119699.
- ^ "USDA - National Agricultural Statistics Service Homepage".
- ^ a b Graybosch, R. A.; Baltensperger, D. D. (February 2009). "Evaluation of the waxy endosperm trait in proso millet". Plant Breeding. 128 (1): 70–73. doi:10.1111/j.1439-0523.2008.01511.x.
- ^ Lyman James Briggs; Homer LeRoy Shantz (1913). The water requirement of plants. Govt. Print. Off. pp. 29–.
- ^ a b Merkblatt für den Anbau von Rispenhirse im biologischen Landbau, www.biofarm.ch, http://www.biofarm.ch/assets/files/Landwirtschaft/Merkblatt_Biohirse_Version%2012_2010.pdf(23.11.14) Archived 2015-02-03 at the Wayback Machine.
- ^ Hanna WW, Baltensperger DD, Seetharam A (2004). "Pearl Millet and Other Millets". In Moser LE, Burson BL, Sollenberger LE (eds.). Warm-Season (C4) Grasses. Agronomy Monographs. 45. pp. 537–560. doi:10.2134/agronmonogr45.c15. ISBN 9780891182375.
- ^ Santra, D.K.; Rose, D.J. (2013). "Alternative Uses of Proso Millet" (PDF). University of Nebraska-Lincoln Extension. p. 2.
- ^ "Pale Millet Malt - 5 LB". Gluten Free Home Brewing. c. 2015. 2022-08-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित.