पुणे मोनोरेल
Appearance
पुणे मोनोरेल | |
---|---|
स्थान | पुणे, महाराष्ट्र |
मार्ग | २ (नियोजित) |
मार्ग लांबी | ५२ किमी कि.मी. |
एकुण स्थानके | १८ (नियोजित) |
मुख्यालय | पुणे |
पुणे मोनोरेल भारतातील पुणे शहरासाठी अनेक मार्गांची प्रस्तावित जलद परिवहन प्रणाली आहे. २०२४ पर्यंत, यावर काहीच काम सुरू झाले नाही, त्याऐवजी २०२२ मध्ये पुणे मेट्रो सुरू झाली.
पार्श्वभूमी
[संपादन]पुणे महानगरपालिकेने रस्त्यावरील गर्दी आणि खासगी वाहनांची संख्या कमी करण्यासाठी मोनोरेल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला. मोनोरेलचे काम पुणे महानगरपालिका करणार असे ठरले होते.
जाळे
[संपादन]पुणे मोनोरेलचे ३ मार्ग प्रस्तावित होते : [१]
रिंग रोड मार्गिका
[संपादन]पहिला मोनोरेल मार्ग प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (HCMTR) प्रकल्पासोबत धावेल. या मार्गाची लांबी ३० किमी असेल.[२]
वारजे-खराडी मार्गिका
[संपादन]वारजे ते खराडी, २२ किमी लांबीचा मार्ग.
कोथरूड - थोरात उद्यान मार्गिका
[संपादन]२०२४ मध्ये, कोथरूड, पुणे येथून थोरात उद्यानापर्यंत मोनोरेल मार्गिका प्रस्तावित करण्यात आली होती. [३] बांधकाम सुरू होण्यापूर्वी २०२४ मध्ये प्रकल्प स्थगित करण्यात आला. [४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Monorail News Briefs". Monorails.org. 2010-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-16 रोजी पाहिले.
- ^ "Civic body nod for 30-km inner ring road, 52-km monorail - Indian Express".
- ^ "Pune: PMC Halts Monorail Project in Kothrud's Thorat Udyan - PUNE PULSE". 23 May 2024.
- ^ "Pune: PMC Halts Monorail Project in Kothrud's Thorat Udyan - PUNE PULSE". 23 May 2024.