पिंपळगव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिंपळगव्हाण हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. पिंपळगव्हाण हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . हे मुळ गाव 'नानी' नदीच्या काठापासुन २०० मीटर अंतरावर वसलेले आहे. पण सध्या जुन्या गावठाणातील जवळपास ९५% लोकवस्ती ही मोहोज देवढे रस्त्याच्या दुतर्फा राहण्यासाठी स्थलांतरित झालेली आहे. गावात वंजारी जातीची संख्या ९९% आहे त्याच सोबत महार, मांग व चांभार वगळता गावात अन्य कुठल्याच जातीच्या व्यक्ती राहत नाहीत. गाव १००% हिंदू धर्मीय आहे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी नॅशनल हायवे २२२ ( नवीन राष्ट्रीय महामार्ग ६१ ) वर फाटा आहे तिथून एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. गावात डॉ. प्रसाद फुंदे यांनी खासगी विनाअनुदानित तत्वावर माध्यमिक व ज्युनियर कॉलेज ची स्थापना केली आहे. पिंपळगव्हाण गावातील लोक खरीप मधे प्रामूख्याने बाजरी, कापूस, मुग, उडीद व अलीकडील काळात सोयाबीन चे अत्यल्प प्रमाणात पीक घेतात. रब्बी हंगामात मुख्यत्वे कांदा पिकाच उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल जात.

गावातील साक्षरता ही अलीकडील काळात नवीन पिढीमध्ये १००% आहे. गावातील युवक सरकारी, खाजगी नोकरी निमीत्ताने गाव सोडुन शहराकडे स्थलांतर करत असतात. गावातील युवकांचा आर्मी व पोलीस दलात जाण्यात जास्त ओढा असून अलीकडील काळात अभियांत्रिकी व औषधनिर्मिती ( Pharmcy) मधे ही बराचसा कल वाढलेला आहे.

राजकीय दृष्टीने स्व. गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव असलेले हे गाव असून आतापर्यंत जास्तीत जास्त कल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने राहिलेला आहे.