पासचेनडेलची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पासचेनडेलची लढाई तथा इप्रेसची तिसरी लढाई (जर्मन:फ्लांडर्नश्लाख्ट; डच:दोसिमे बतेल देस फ्लांडर्स) ही पहिल्या महायुद्धादरम्यान जर्मनीदोस्त राष्ट्रांमध्ये लढली गेलेली लढाई होती.

३१ जुलै ते १९ नोव्हेंबर, १९१७ दरम्यान बेल्जियमच्या इप्रेस शहराजवळ लढल्या गेलेल्या या लढाईत दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. दोस्तांनी २,४४,८९७ सैनिक गमावल्याचा तर जर्मनीचे २,५०,००० ते ४,००,००० सैनिक मृत्युमुखी पडल्याचे अंदाज व्यक्त केले गेलेले आहेत. याशिवाय दोस्तांनी जर्मनीचे २४,०६५ सैनिक युद्धबंदी करून घेतले. या लढाईत कोणत्याच पक्षाचा निर्णायक विजय झाला नाही.