पारलिंगी ध्वज

| एलजीबीटी लेखमालीकेचा भाग |
| एलजीबीटी चिन्हे |
|---|
| साचा:Color strip |
| स्वाभिमान ध्वज |
| इतर चिन्हे |
पारलिंगी स्वभिमान ध्वज, किंवा पारलिंगी ध्वज व्यक्ती, संस्था आणि समुदाय पारलिंगी व्यक्तींचे स्वाभिमान आणि हक्कांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरतात. या ध्वजाचा उपयोग मूळ इंद्रधनुष्य ध्वजासारखाच असून , याचा वापर विशिष्टपणे पारलिंगी समुदायाच्या संबंधात केला जातो.
हा ध्वज १९९९ मध्ये मोनिका हेल्म्स यांनी संकल्पित केला होताआणि तेव्हापासून जगभरातील पारलिंगी समुदायाने हा ध्वज स्वीकारला आहे. [१] [२]
या ध्वजात हलका निळा, हलका गुलाबी, पांढरा, हलका गुलाबी आणि हलका निळा अशा क्रमाने तीन रंगांचे पाच आडवे पट्टे आहेत. या संबंधित आणखी ध्वज देखील आहेत, ज्यामध्ये पारलिंगी आणि माध्यलिंगी ध्वजांसह इंद्रधनुष्य ध्वजाच्या "प्रगती" आवृत्तीला एकत्र करणारे ध्वज, [३] तसेच पारलिंगी आणि अद्विवर्णी समुदायांमधील सुस्थानाक समुदायांचे विविध ध्वज आहेत. [४]
इतर संकल्पना
[संपादन]आता पारलिंगी ध्वज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या हेल्म्सद्वारे संकल्पित ध्वजाव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत कलाकारांनी काही पर्यायी पारलिंगी ध्वज संकल्पित केले आहेत. [५] [६] [७]
अँड्र्यू संकल्पना
[संपादन]
१९९९ मध्ये, सॅन फ्रान्सिस्कोचे पारलिंगी कलाकार जॉनाथन अँड्र्यू, त्याच्या महिला-ते-पुरुष पारलिंगी संकेतस्थळ "अॅडव्हेंचर्स इन बॉयलँड" वर "कॅप्टन जॉन" या टोपणनावाने, पारलिंगी समुदायातील लोकांसाठी एक ध्वज संकल्पित आणि प्रकाशित केला. या पारलिंगी स्वाभिमान ध्वजात हलक्या गुलाबी आणि हलक्या निळ्या रंगाचे सात पट्टे आहेत जे पातळ पांढऱ्या पट्ट्यांनी वेगळे केले आहेत आणि वरच्या डाव्या कोपऱ्यात, तामणी रंगात जुळे शुक्र आणि मंगळ चिन्ह दर्शविले आहे. मोनिका हेल्म्सच्या अधिक प्रसिद्ध ध्वज संकल्पानेसाठी रंग प्रतीकात्मकतेचे वारंवार स्पष्टीकरण इतर पृष्ठांवर अँड्र्यूच्या संकल्पनेच्याच्या वर्णनासारखेच आहे. [८] [ <span title="Current source is a self-published website by the creator of the Andrew flag, need reliable secondary source (May 2024)">संदर्भ आवश्यक</span> ]
पेलिनेन संकल्पना
[संपादन]
जेनिफर पेलिनेन यांनी २००२ मध्ये हा ध्वज संकल्पित केला होता. या ध्वजात वरच्या बाजूला गुलाबी ते खालच्या बाजूला निळ्या रंगापर्यंत पाच पट्टे आहेत. गुलाबी आणि निळा अनुक्रमे पुरुष आणि महिला दर्शवितात आणि तीन जांभळ्या पट्टे पारलिंगी समुदायाची विविधता तसेच पुरुष आणि महिला व्यतिरिक्त इतर लिंगभावांचे प्रतिनिधित्व करतात. [९] [१०]
इस्रायली पारलिंगी ध्वज
[संपादन]
इस्रायलमध्ये पारलिंगी आणि अद्विवर्णी समुदायाद्वारे एक अनोखी रचना वापरली जाते. [११] [ अविश्वसनीय स्रोत? ] या ध्वजात (सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे दिसण्यासाठी) निऑन हिरवी पार्श्वभूमी आहे, आणि मध्यभागी शुक्र आणि मंगळ यांचे चिन्ह आहेत ज्यावर काळ्या रंगात स्ट्रोक चिन्ह आहे जे पारलिंगी लोकांचे प्रतिनिधित्व करते. [१२]

ओंटारियोमध्ये, ओटावामधील संकल्पचित्रकार मिशेल लिंडसे यांनी तयार केलेला "पारलिंगी ध्वज " म्हणून ओळखला जाणारा ध्वज वापरला जातो. त्यात दोन पट्टे असतात, सनसेट गुलबक्षी रंगात वरचा भाग स्त्रीचे प्रतिनिधित्व करतो आणि निळ्या रंगात खालचा भाग पुरुषाचे प्रतिनिधित्व करतो. मध्यभागी शुक्र, मंगळ आणि मंगळाचे स्ट्रोक असलेले चिन्ह पारलिंगी लोकांचे प्रतिनिधित्व करते.
हे देखील बघा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "What is the Meaning of the Transgender Flag?". NIH. 1 June 2023. 14 May 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Here's the Meaning Behind the Colors of the Transgender Pride Flag". Seventeen. 30 May 2023. 14 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Intersex-Inclusive Progress Pride Flag at the Smithsonian | Cooper Hewitt, Smithsonian Design Museum". www.cooperhewitt.org (इंग्रजी भाषेत). 2023-06-20. 22 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-02-22 रोजी पाहिले.
- ↑ "Pride Flags". The Gender and Sexuality Resource Center (इंग्रजी भाषेत). 28 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-02-22 रोजी पाहिले.
- ↑ "The History of the Transgender Flag". 23 April 2015. 3 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 5, 2024 रोजी पाहिले.
- ↑ Lafuente, Cat (9 March 2023). "The Truth About The Trans Flag". The List. 30 April 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ "The Designer Of The Transgender Flag Is A Navy Veteran". FastCompany. 27 July 2017. 11 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Wayback Machine: Adventures in Boyland". रोजी मूळ पानापासून संग्रहित6 March 2001. 19 June 2017 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ↑ "Transgender Flag - Pellinen Design". 30 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 October 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Supporting Bisexual Employees in the Workplace" (PDF). 2019. p. 9. 22 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 22 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ Osmanski, Stephanie (June 1, 2021). "Get to Know the History Behind 21 LGBTQIA+ Pride Flags and What They Each Represent". Parade: Entertainment, Recipes, Health, Life, Holidays. 24 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 21, 2021 रोजी पाहिले.
- ↑ Empty citation (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमिडिया कॉमन्सवर Transgender flags शी संबंधित संचिका आहेत.