पारलिंगीद्वेष

परलिंगीद्वेष म्हणजे पारलिंगी लोकांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, भावना किंवा कृती प्रतिबिंबित करणाऱ्या कल्पना आणि घटनांचा संग्रह. यात भीती, तिरस्कार, द्वेष, हिंसा, राग किंवा सामाजिक लिंग अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या लोकांबद्दल अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो. [१] [२] हे बहुतेकदा समलैंगिकद्वेषासोबत व्यक्त केले जाते म्हणून पारलिंगीद्वेष हा समलैंगिकद्वेषाचा एक पैलू मानले जातो. पारलिंगीद्वेष, हा वंशवाद, जातीवाद, आणि लिंगभेदासारखाच पूर्वग्रह आणि भेदभावाचा एक प्रकार आहे. [३] आणि कृष्णवर्णीय किंवा तथाकथित "खालच्या" जातीचे पारलिंगी व्यक्ती बहुतेकदा तिन्ही प्रकारच्या भेदभावाचे बळी असतात. [४]
हिंसाचार आणि इतर धोक्यांच्या वाढत्या धोक्यांव्यतिरिक्त, पारलिंगीद्वेषामुळे निर्माण होणारा ताण नकारात्मक भावनिक परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. याचा परिणाम म्हणजे मादक पदार्थांचा गैरवापर, घरातून पळून जाणे (अल्पवयीन मुलांसाठी) आणि आत्महत्या करणे असे असू शकतात.
पाश्चात्य आणि विकसनशील देश हळूहळू भेदभाव विरोधी आणि समान संधींची धोरणे स्थापित करण्याकडे वाटचाल करत आहेत. इतर लिंगभाव ओळखींची सामाजिक स्वीकृती सुधारण्यासाठी एल.जी.बी.टी. समुदायाशी संबंधित मोहिमा देखील जगभरात पसरवल्या जात आहेत. संयुक्त राष्ट्रांची "स्ट्रिप द स्टिग्मा" मोहीम ही असाच एक प्रयत्न आहे. [५]
लिंग परिवर्तन प्रक्रियेच्या आधी आणि नंतर अनेक पारलिंगी लोकांमध्ये चुकीची लिंगभाव ओळख पटवण्याचे अनुभव सामान्य आहेत[६] पारलिंगी व्यक्तींना डॉक्टर, पोलिस, मीडिया आणि समवयस्कांकडून नियमितपणे चुकीच्या लिंगभाव ओळखीने नेमले आणि ओळखले जाते आणि पारलिंगी व्यक्ती या अनुभवांचे वर्णन "वेदनादायक", [७] "दुखावणारे", "क्रूर", , आणि "जीवन अधिक कठीण करणारे" असे सांगतात. [८]। अॅडोलेसेंट हेल्थ [९] या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या १२९ पारलिंगी आणि इतर लिंगभाव असणाऱ्या करणाऱ्या तरुणांच्या २०१८ च्या अभ्यासात असे आढळून आले की "त्यांच्या निवडलेल्या नावाचा वापर सामाजिक संदर्भात केल्याने, नैराश्याच्या लक्षणांमध्ये, आत्महत्येच्या विचारसरणीत आणि आत्महत्येच्या वर्तनात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय घट झाली." [१०] पारलिंगी व्यक्तींना जाणूनबुजून चुकीच्या लिंगभावाने ओळखणे अत्यंत आक्षेपार्ह वाटते.
मानसिक आरोग्य
[संपादन]पारलिंगी व्यक्तींना पारलिंगीद्वेषामुळे आणि भेदभावामुळे मानसिक आरोग्य समस्या होण्याची शक्यता जास्त असते. विरुपाक्ष, मुरलीधर आणि रामकृष्ण यांच्या मते, जगभरात ३२% ते ५०% पारलिंगी व्यक्ती आत्महत्येचे प्रयत्न करतात. भारतात, ३१% ते ५०% पारलिंगी व्यक्तींनी २० वर्षांच्या वयापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, ५०% पारलिंगी व्यक्तींनी आणि इंग्लंडमध्ये ४५%पारलिंगी व्यक्तींनी किमान एकदा तरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. [११]
हे देखील बघा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Chakraborti, Neil; Garland, Jon (2009). Hate Crime: Impact, Causes and Responses. SAGE Publications, Ltd. pp. 77. ISBN 978-1412945684.
- ^ Chrisler, Donald R.; McCreary, Joan C. (2010). Handbook of Gender Research in Psychology, Volume 2. Springer. p. 366. ISBN 978-1441913555.
- ^ Judith A. Lewis, Michael D. Lewis, Judy A. Daniels, Community Counseling: A Multicultural-Social Justice Perspective (2010, आयएसबीएन 113317003X)
- ^ Doug Meyer, Violence Against Queer People: Race, Class, Gender (2015, आयएसबीएन 0813573181), pp. 14–15 (Alternate: 14, 15)
- ^ Chakraborti, Neil; Garland, Jon (2009). Hate Crime: Impact, Causes and Responses. SAGE Publications, Ltd. pp. 77. ISBN 978-1412945684.

- ^ Virupaksha, H. G.; Muralidhar, Daliboyina (2016). "Suicide and Suicidal Behavior among Transgender Persons". Indian Journal of Psychological Medicine. 38 (6): 505–509. ISSN 0253-7176. PMC 5178031. PMID 28031583.