पामेला मल्होत्रा
India sanctuary owner | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | c. इ.स. १९५२ Red Bank | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
पुरस्कार | |||
| |||
![]() |
पामेला गेल मल्होत्रा ही एक अमेरिकन वंशाची भारतातील प्राणी अभयारण्याची मालकीण आहे. एसएआय (SAI) अभयारण्यातील तिच्या कामासाठी तिला भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार, नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयुष्य
[संपादन]पामेला गेलचा जन्म सुमारे १९५२ मध्ये न्यू जर्सीमधील रेड बँक येथे झाला. [१] पामेला चे एक भारतीय रेस्टॉरंट मालक, डॉ अनिलकुमार मल्होत्राशी लग्न झाले. लग्ना नंतर हे जोडपे हवाई येथे मधुचंद्रासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ती एका औषध कंपनीत कामाला लागली, तर तर तिचा नवरा गृहकर्ज व्यवसायात कामाला लागला. पामेलच्या एकटीच्या पगारावर घर चालवले जात होते. तर तिच्या पतीचे विक्री कमिशन हवाईमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी वाचवले गेले होते. वाचणाऱ्या पैशातून दोघांनी मिळून स्वतःचे जंगल निर्माण करण्याचे ठरवले होते.[१]
परंतु काही कारणाने त्यांनी हवाई सोडून भारतात त्यांचे पैसे वापरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हे जोडपे प्रथम हिमालयात गेले. परंतु तिथे फक्त १२ एकर जमीन खरेदी करण्याची परवानगी होती. म्हणून मग ते दक्षिण भारतात आले. इथे त्यांनी SAI (सेव्ह अॅनिमल्स इनिशिएटिव्ह) सॅन्कच्युरी ट्रस्ट सुरू केली.[२]
त्यांच्या अभयारण्यातील वन्यजीवांमध्ये बंगाल वाघ,[२] आशियाई हत्ती,[३] तरस, रानडुक्कर, बिबट्या, सांभर आणि मलबार महाकाय खार यांचा समावेश दिसून येतो.[४]

या कामासाठी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी, त्यांना नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[५] पुरस्कार स्वरूपात प्रशस्तिपत्र आणि १००,००० रुपये देण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ a b "24 Hours In Life Of Anil And Pamela Malhotra: Life In Lap Of Wilderness, Surrounded By Elephants | Outlook India Magazine". Outlook (India). 2020-04-23 रोजी पाहिले.
- ^ a b "The Couple Who Bought Barren Land In 1991 And Transformed It Into A 300 Acre Wildlife Sanctuary". The Better India. 23 February 2015. 23 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Green Initiative". Deccan Herald. 3 October 2011. 21 December 2015 रोजी पाहिले.
- ^ The Outdoor Journal (12 February 2015). "Award-winning couple attempts to save India's rainforests by buying them up". The Outdoor Journal. 2015-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "Nari Shakti Awardees". Ministry of Women and Child Development. 2017-03-17. 2024-04-04 रोजी पाहिले.