Jump to content

पामेला चॅटर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पामेला चॅटर्जी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावPamela संपादन
आडनावChatterjee संपादन
व्यवसायलेखक संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

पामेला चॅटर्जी (जन्म: १९३०) या एक भारतीय लेखिका आणि ग्रामीण कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या प्रकल्पामुळे ६,२५,००० हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली. चॅटर्जी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

आयुष्य

[संपादन]

पामेला चॅटर्जी यांचा जन्म सुमारे १९३० मध्ये झाला.

चॅटर्जी भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊं प्रदेशात राहतात.[]

जागतिक बँकेच्या पाठिंब्याने चॅटर्जी यांनी ४,६०० हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिली. हा प्रकल्प ९५ शेतकऱ्यांपासून सुरू झाला परंतु दोन वर्षांत ही संख्या वाढली.[] सदरील जमिनीत सोडियमचे प्रमाण जास्त होते आणि तिला खारपड जमीन म्हणून ओळखले जाते. जमिनीतून भाताच्या पहिल्या कापणीत पारंपारिक शेतांपेक्षा जास्त उत्पादन मिळाले.[] २००५ मध्ये चटर्जी यांनी "लिसन टू द माउंटन्स: अ हिमालयन जर्नल" प्रकाशित केले.[] अखेर १०,००० शेतकरी झाले आणि ६,२५,००० हेक्टर जमीन परत मिळवली गेली.[]

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना चॅटर्जी

चॅटर्जी यांनी स्वतःचे शेतीतील अनुभव "द जामुन ट्री" या पुस्तकाच्या स्वरूपात लिहिले. सदरील पुस्तक २०१२ मध्ये प्रकाशित झाले.[] या पुस्तकात प्रकल्पाचे वर्णन आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि प्रसंगांच्या आठवणींचा समावेश आहे.[] हे पुस्तक आध्यात्मिक व्यक्तिमत्व रमेश ओझा यांना समर्पित करण्यात आले आणि जागतिक बँकेच्या दिल्ली कार्यालयात डॉ. अशोक खोसला यांनी त्याचे प्रकाशन केले.[]

२०१७ मध्ये चॅटर्जी यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तेथे उपस्थित होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Chatterjee, Pamela; Addor-Confino, Catherine (2005). Listen to the mountains: a Himalayan journal (इंग्रजी भाषेत). Viking, Penguin Books India. ISBN 9780670058396.
  2. 1 2 3 "The Jamun Tree and other stories on the environment by Pamela Chatterjee buy online". bookstore.teri.res.in. 2020-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-11 रोजी पाहिले.
  3. India, Government of (2018-03-08), English: Pamela Chatterjee biog from official twitter feed, 2020-04-12 रोजी पाहिले
  4. Chatterjee, Pamela (2012-01-01). The Jamun Tree and other Stories on the Environment (इंग्रजी भाषेत). The Energy and Resources Institute (TERI). ISBN 978-81-7993-440-1.
  5. "Book Dedicated to Ramesh Bhai Released". sashram.org. 2025-09-05 रोजी पाहिले.
  6. "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2020-04-11 रोजी पाहिले.