पापडी (वृक्ष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पापडी या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

पापडी हा एक मोठा वृक्ष आहे. याचे लाकूड मजबूत नसते. याचा काड्या जाळण्यासाठी वापर होतो. शेळ्या,बकऱ्या,ढोरे-वासरे याचा पाला खातात.

उपयोग[संपादन]

फोड झाले किंव्हा जखम झाली तर पापडीच्या मुळ्या किंव्हा साल ठेचून त्याचा लेप फोडांना लावतात. व जखमेच्या आत भरतात. जखम लवकर भरून येते.गोंदेच्या गोंदे (झुपकेच्या झुपके) शेंगा लागतात. आत बिया असतात. या बियांपासून तेल काढतात. हे तेल डोक्याला लावायला,दिवा लावायला व स्वयंपाक करण्यात उपयोगी पडते.डोक्यात उवा झाल्या तर पापडीचे तेल डोक्याला लावतात. या तेलात शिजलेली भाजी चांगली लागत नाही पण या तेलात वडे तळले तर छान लागतात. मोह शिजवून खाताना त्यावर थोडे पापदीचे तेल टाकल्यावर चांगली चव येते. तळहाताला,तळपायाला भेगा पडल्या तर पापदीचे तेल लावून मालीश करतात.

संदर्भ[संपादन]

गोईण - डॉ. राणी बंग