पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८ | |||||
आयर्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ११ २०१८ – १५ मे २०१८ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफील्ड | सरफराज अहमद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | केव्हिन ओ'ब्रायन (१५८) | फहीम अशरफ (८३) | |||
सर्वाधिक बळी | टिम मर्टाघ (६) | मोहम्मद अब्बास (९) |
पाकिस्तान क्रिकेट संघ मे २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जून २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने आयर्लंडला कसोटी दर्जा दिल्यानंतरची ही आयर्लंडची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय कसोटी असणार आहे. आयसीसीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ऑकलंड येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सामन्याची तारीख जाहीर केली. एकमेव कसोटी सामना पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याआधी होणार आहे.
वॉरन ड्युट्रोम, आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ, यांनी आयर्लंडच्या कसोटी पदार्पणासाठी संघाला अभिनंदन केले व पाकिस्तान क्रिकेट संघचे आभार मानले. क्रिकेट आयर्लंडचे डायरेक्टर, रिचर्ड हॉल्ड्सवर्थ, यांनी भविष्यात पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
कसोटी मालिका
[संपादन]एकमेव कसोटी सामना
[संपादन]११-१५ मे २०१८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: आयर्लंड, गोलंदाजी.
- पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- आयर्लंडचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना.
- ॲंड्रु बल्बिर्नी, एड जॉईस, ट्यारोन केन, टिम मर्टाघ, केव्हिन ओ'ब्रायन, नायल ओ'ब्रायन, विल्यम पोर्टरफील्ड, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्सन (आ), फहीम अशरफ आणि इमाम उल हक (पाक) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.