पाकिस्तानी क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५
| पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २० – २४ जुलै २०२५ | ||||
| संघनायक | लिटन दास | सलमान अली आगा | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | जाकर अली (७१) | साहिबजादा फरहान (६३) | |||
| सर्वाधिक बळी | तास्किन अहमद (६) | सलमान मिर्झा (७) | |||
| मालिकावीर | जाकर अली (बां) | ||||
जुलै २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[२] ही मालिका दोन्ही संघांसाठी, २०२५ आशिया चषक आणि २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून खेळविली गेली.[३] हे सामने ढाका येथील शेर-इ-बांग्ला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले.[४] मार्च २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले.[५]
मूळतः, हा दौरा फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा होता. तथापि, २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी, दोन्ही बोर्डांनी परस्पर सहमतीने तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेवर सहमती दर्शवली.[६]
बांगलादेशने पाकिस्तानवर त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय मिळवत मालिका २-१ च्या फरकाने जिंकली.[७]
संघ
[संपादन]आं.टी.२० मालिका
[संपादन]१ला आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सलमान मिर्झा (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- मुस्तफिझुर रहमानने (बां) बांगलादेशतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात किफायतशीर स्पेल टाकला (४ षटकांमध्ये २ बाद ६ धावा, इकॉनॉमी रेट १.५).[१०]
- टी२० सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला सर्वबाद करण्याची ही पहिलीच वेळ होती.[११][१२]
२रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अहमद दानियाल (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
३रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Pakistan to tour Bangladesh in July" [जुलैमध्ये पाकिस्तान बांगलादेशचा दौरा करणार]. बिडीक्रिकटाईम (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pakistan, Bangladesh replace ODIs with T20Is in upcoming tours" [पाकिस्तान, बांगलादेश आगामी दौऱ्यांमध्ये एकदिवसीय सामन्यांऐवजी टी२० सामने खेळणार]. द एक्सप्रेस ट्रिब्यूनल (इंग्रजी भाषेत). २४ मार्च २०२५. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "বড় পরীক্ষা সামনে, তাই পাকিস্তানের সঙ্গে হিসেবটা বদলে নিয়েছে বাংলাদেশ" [मोठी परीक्षा पुढे आहे, म्हणून बांगलादेशचे पाकिस्तानसोबत खाते बदल]. इंडिपेन्डन्ट टेलिव्हिजन (Bengali भाषेत). २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to host Pakistan for three-match T20I series: Full schedule, dates, venues" [बांगलादेश तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार: संपूर्ण वेळापत्रक, तारखा, ठिकाणे]. स्पोर्टस्टार. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh and Pakistan set to play T20Is instead of ODIs" [बांगलादेश आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्याऐवजी टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज.]. क्रिकफ्रेन्झी (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "No ODIs in Bangladesh-Pakistan series in May and July" [मे आणि जुलैमध्ये बांगलादेश-पाकिस्तान मालिकेत एकदिवसीय सामने होणार नाहीत]. द डेली स्टार (बांगलादेश) (इंग्रजी भाषेत). २३ मार्च २०२५. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jaker-Mahedi and Shoriful-Tanzim give Bangladesh first T20I series win against Pakistan" [जाकर-महेदी आणि शोरीफुल-तन्झीम यांनी बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका विजय मिळवून दिला.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh vs Pakistan Dream 11 Team Prediction" [बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान ड्रीम ११ संघाचा अंदाज]. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Pakistan squad announced for Bangladesh T20I series" [बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा]. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ८ जुलै २०२५. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh T20I matches bowling best economy rate innings" [बांगलादेश टी२० सामने डावातील सर्वोत्तम गोलंदाजी इकॉनॉमी रेट]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Mustafizur Rahman breaks Bumrah's record as Bangladesh bowl out Pakistan for the first time in T20I history" [मुस्तफिझुर रहमानने बुमराहचा विक्रम मोडीत काढला, बांगलादेशने आंतरराष्ट्रीय टी२० इतिहासात प्रथमच पाकिस्तानला नमवले]. द इकॉनॉमिक टाइम्स. २० जुलै २०२५.
- ^ "Bangladesh vs Pakistan Live Score, T20: PAK in Massive Trouble, 7 Wickets Down In Dhaka" [बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह स्कोअर, टी२०: पाकिस्तान मोठ्या अडचणीत, ढाक्यात ७ विकेट गमावल्या]. टाइम्स नाऊ. २० जुलै २०२५. २० जुलै २०२५ रोजी मूळ पान पासून संग्रहित.

