पाकशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Copyright-problem paste.svg***मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट करून घेतलेल्या मजकुर ओळीची/परिच्छेदाची सीमारेषा / समाप्ती रेषा अशी दाखवावी***

पाकशास्त्राची साचेबंद व्याख्या करणे अवघड असले, तरी कोणत्याही वनस्पतिजन्य वा प्राणिजन्य पदार्थाचा वापर करून आणि त्यावर विविध पद्धती व कृती करून निरनिराळ्या तऱ्हेचे खाद्यपदार्थ बनविण्याच्या शास्त्राला अथवा कलेला पाकशास्त्र असे म्हणता येईल.

हवा आणि पाणी यांच्या इतकीच मानवाची अन्न ही एक जीवनावश्यक मूलभूत गरज आहे. म्हणूनच ही गरज भागविण्यासाठी मानवाला अन्नाच्या शोधासाठी प्रारंभीच्या काळात फिरावे लागे. अतिप्राचीन मानवाच्या सवयी रानटीच होत्या. त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे भूक शमविण्यासाठी मिळतील ते प्राणि-पक्षी मारून त्यांचे मांस किंवा कंदमुळे, फळे इ. पदार्थ कच्चेच तो खात असे. पुढे अग्नीचा शोध लागल्यावर मांस भाजून अथवा शिजवून खाल्ल्यास ते रुचकर लागते हे त्याच्या लक्षात आले.

पाकशास्त्र म्हटले की, ते क्षेत्र स्त्रियांचेच असे सामान्यतः मानले जाते; पण सध्याच्या सुधारलेल्या व गतिमान जीवनात स्त्रियांनाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणे भाग पडू लागल्याने पाकशास्त्रात पुरुषांचा वावर वाढू लागला आहे. तसेच तयार खाद्यपदार्थ झटपट मिळावेत म्हणून बरेच कारखाने निर्माण झाले. खाद्य तंत्रात बऱ्याच सुधारणा व प्रगती झाली. वेळेचा अभाव व पाककलेतील अपुरे कौशल्य यांमुळे सुधारलेल्या देशांतील कर्मचारी तयार  खाद्यपदार्थांकडे आकर्षित झाले.

जगातील प्रत्येक देशातील स्वयंपाक पद्धतीत तीमध्ये वापरले जाणारे पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करण्याच्या पद्धती, त्यांची रुची, स्वाद इत्यादींनुसार फरक आढळून येतो. तसेच प्रत्येक देशाचे हवामान, पदार्थांची उपलब्धता, धर्म, रीतिरिवाज इत्यादींनुसारही तेथील लोकांच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्याचे आढळून येते. सर्वसाधारणतः पाश्चिमात्य देशांतील लोकांना झणझणीत, तिखट व मसालेदार जेवण वा पदार्थ आवडत नाहीत व पचतही नाहीत; परंतु जसजसे पश्चिमेकडून पूर्वेकडे जावे, तसतसे स्वयंपाकात मसाल्याच्या वापराचे प्रमाण वाढत जाते, असे आढळून येते.

पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांच्या मधे असणाऱ्या भारतात मसाल्यांच्या वापराबाबत वेगळी परिस्थिती आढळून येते. दुसरे महत्त्वाचे कारण हे की, मिरी, दालचिनी, धने, जिरे, आले, लसूण इ. अनेक मसाल्यांच्या पदार्थांचे भारतात उत्पादन होते व साहजिकच त्यांचा उपयोग स्वयंपाकात विशिष्ट स्वाद व रुची ह्यांसाठी सर्रास केला जातो. मसाल्याच्या वापराने भारतीय पदार्थ खमंग व चमचमीत होतात. सर्वसाधारणतः पदार्थ अर्धवट शिजविण्यापेक्षा वा भाजण्यापेक्षा पूर्णपणे शिजवणे, तळणे वा खरपूस भाजणे महत्त्वाचे समजले जाते. जगातील रूढ मसाल्यांशिवाय हिंग, कढीलिंब, ओवा, वेलची इत्यादींचा उपयोग भारतीय पाकशास्त्रात केला जातो.

असे पदार्थ परंपरागत पाकपद्धतीने करण्यात येतात. पूर्ण शाकाहारी आहाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपवास, व्रतवैकल्ये इ. प्रसंगी करण्यात येणारे खाद्यपदार्थ नेहमीपेक्षा वेगळे असे तयार करण्यात येतात. कालमानानुसार पूर्ण शाकाहारी लोकांपैकी काही लोक मांसाहाराकडे अंशतः वळू लागले आहेत. तथापि पूर्ण शाकाहाराचे संपूर्णपणे उच्चाटन होणार नाही.


  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले