पाउला बदोसा
पाउला बदोसा जिल्बेर्त (१५ नोव्हेंबर, १९९७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही २५ एप्रिल, २०२२ रोजी डब्ल्यूटीए एकेरी क्रमवारीत २ आणि दुहेरीत १२४ व्या क्रमांकावर होती.
बदोसाचा जन्म न्यू यॉर्कमधील मॅनहॅटन येथे स्पॅनिश मिरेया जिल्बेर्त बारो आणि जोसेप बदोसा कोदोलार यांच्या घरी झाला. हे दोघेही मॉडेल आहेत. [१] पाउला सात वर्षांची असताना तिचे कुटुंब बार्सेलोनाला परत गेले. तेथे तिने टेनिस खेळायला सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी टेनिसमध्ये कारकीर्द करण्यासाठी ती व्हॅलेन्सियाला गेली आणि १७ व्या वर्षी ती बार्सिलोनाला परतली. [२] [३]
बदोसा स्पॅनिश व्यतिरिक्त कॅटलान, इंग्लिश आणि थोडीशी फ्रेंच भाषा बोलते. [४] तिची आवडती स्पर्धा यूएस ओपन आहे. [५] तिचे लहानपणीचे आदर्श राफेल नदाल आणि मारिया शारापोव्हा होते. [१] बदोसा सिमोना हालेपची खूप मोठी चाहती आहे. [६] [७]
बदोसाला लहान असताना तिच्या पालकां प्रमाणे एक मॉडेल व्हायचे होते. [८] तिला नैराश्य आणि काळजी यांचा सामना करावा लागला आहे. [९]
संदर्भ
[संपादन]- 1 2 JF de la Cruz (17 June 2015). "Paula Badosa, la campeona del Roland Garros júnior: "Me identifico con María Sharapova" (in Spanish)" [Paula Badosa, junior Roland Garros champion: "I identify with María Sharapova"]. 20 minutos. 17 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 January 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Raul Cosin, Sheila Perez (15 October 2018). "Paula Badosa: On the attraction by peculiarity and a brave tennis". Visibilitas. 10 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ Viñas, Sergio R. (18 October 2021). "El sinuoso pero decidido camino de Paula Badosa hacia el éxito: "Siempre soñó a lo grande"". El periódico de España (स्पॅनिश भाषेत). 25 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 March 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Who is Paula Badosa's Boyfriend? Know all about Juan Betancourt". First Sportz. 18 October 2021. 10 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Paula Badosa Bio". wtatennis.com. Women’s Tennis Association. 30 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ ""I am very attracted to the style she has!" Paula Badosa is a huge admirer of this WTA star's playing style!". firstsportz.com. 20 December 2021. 20 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ ""I am very attracted to the style she has, it goes far beyond being defensive or aggressive"- Paula Badosa on Simona Halep". Sportskeeda. 20 December 2021. 20 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 December 2021 रोजी पाहिले.
- ↑ Roger Requena (20 July 2015). "De Manhattan a París passant per Begur (in Catalan)" [From Manhattan to Paris via Begur]. ara.cat. 23 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ David Kane (26 August 2019). "'I had to be brave' – Badosa shares mental health struggle ahead of 2019 US Open debut". wtatennis.com. Women’s Tennis Association. 28 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 January 2021 रोजी पाहिले.