त्रिरश्मी लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पांडवलेणी, नाशिक या पानावरून पुनर्निर्देशित)

पांडवलेणी किंवा त्रिरश्मी लेणी ही नाशिक मधील लेणी आहे.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

इतिहास[संपादन]

पांडवलेण्या ह्या सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेल्या बौद्ध लेण्या आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[१] सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.

पांडवलेणी

स्वरूप[संपादन]

यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपूर्ण सुस्थितीत आहे. पूर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.

[पुर्व दिशेचे प्रवेशद्वार]
पांडवलेणे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार - सकाळचे दृश्य

काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.

अधिक माहिती[संपादन]

या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.

[नाशिक शहराचे विहंगम दृश्य]

पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून नाशिक बौद्ध लेण्यासाठी बसेस सुटतात. अंबडला जाणाऱ्या बसनेही येथे उतरता येते. तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.

हेही पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (इंग्रजी मजकूर). आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.