पवार-पाटील घराणे कसबा बावडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


क्षत्रिय हा प्राचिन हिंदू समाज व्यवस्थेनुसार एक वर्ण होता या वर्णाची व्यक्ती योद्धा समजली जायची. क्षत्रीय वर्णाचे लोक आज मराठा समाज म्हणून ओळखले जातात. पवार हे यापैकी एक हे रजपूत परमार या कुळीतील आहेत. पुढे परमार शब्दाचा अपभ्रंश होउन पवार हा शब्द रुढ झाला.

  नवसाहयांक चरित्रातील एका कथेनुसार ऋषि वशिष्ठांनी विश्वामित्रांविरूद्ध युद्ध पुकारले या कामासाठी त्यानी भाबू पर्वताच्या अग्नीकुंडातून एका विर पुत्राची निर्मीती केली त्याचे पुर्वज सुर्यवंशी क्षत्रीय होते (ज्याला उज्जयनी क्षत्रीय असेही संबोधतात) या विर पुरूषाचे नाव परमार असे ठेवले.

जो या वंशाचा संस्थापक समजला जातो. काही मतांनुसार परमार हे आबू पर्वताचे निवासी आहेत व ते शेजारील राष्ट्रांमध्ये स्थायीक झाले, पण जुन्या नोंदींनुसार परमार दक्षीणेतील राष्ट्रकुटांचे उत्तराधीकारी आहेत.

  परमार परिवाराची मुख्य शाखा मालवा सध्याचे प्राचीन मध्यप्रदेश येथील धार ( प्राचीन नाव धारा ) येथे राज्य स्थापन करून रहात होती. या परिवारातील प्राचीनतम ज्ञात सदस्य उपेंद्र कृष्णराज हे होत या वंशाचे पुर्वीचे शासक राष्ट्रकुटांचे सामंत होते ज्यांनी राष्ट्रकुटांच्या पतनानंतर सिंयक द्वीतीय यांचा पुत्र वाकपतिराज यांच्या नेतृत्वाखाली शंभराव्या शतकाच्या अंतीम २५ वर्षांत झाला व्याक्पती मुंज यांनी दक्षीण राजपुताना राज्याचा एक भाग जिंकून घेतला व त्या प्रदेशात आपल्या वंशातील राजपुत्रांची विविध पदांवर नियुक्ती केली तसेच चालुक्य, चांदेल, कालचुरी आणि चौलुभ्य अशा शक्तीशाली शेजारी राष्ट्रांशी युद्धे करून आपले राज्य स्थापीत केले.
  प्रसिद्ध [[राजा भोज]] हा सुद्धा याच परिवारातील परमार राजा होता, ज्यांचा कालखंड सन.१००० ते १०५५ असा होता. राजा भोज हा मध्ययुगीन सर्वश्रेष्ठ शासकांपैकी एक समजला जातो जो खुप महत्वाकांक्षी होता त्याने आपल्या राज्याचा विस्तार सध्याची मुंबई असलेल्या पश्चीम किनारा संपुर्ण कोकण तसेच दक्षीणेतील मालागार ते उत्तरेकडे सुरतेपर्यंत राज्य असणा~या शिलाहारांचा राजा आरीकेशरी यांचा युद्धात पराभव करून व त्यांना आपले मांडलीक बनवून केला. व या प्रदेशात विविध पदांवर आपल्या वंशातील राजपुत्रांच्या नियुक्त्या केल्या ज्यांना गावाचे प्रांताचे विभागाचे प्रमुखपद दिले. यामध्ये सध्याचे वाई या प्रांताचा समावेश होता..
  वाई जवळील एका गावचे पटील परमार वंशातील एक व्यक्ति होती, सन १७०० च्या ऊत्तरार्धात शिवाजी महाराज यांच्या म्रूत्यू नंतर काही वर्षांत पाटील कुटुंबाच्या  वारसांमध्ये काही वाद होउन एक वारस ताराराणी च्या नेत्रुत्वात नव्याने स्थापन झालेल्या करवीर गादीच्या चाकरीत रूजू झाला त्यास करवीरालगतच्या बावडे (सध्याचे नाव कसबा बावडा) गावची पाटीलकी बहाल करणेत आली.