Jump to content

परोपकारी ईश्वरचंद्र (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महान व्यक्तींची महानता कशामध्ये दडलेली असते हे सांगणारी ही लोककथा.

कथेचा आशय

[संपादन]

इ.स. १८४४ च्या सुमारास कलकत्याच्या एका संस्कृत महाविद्यालयात एका व्याकरणाच्या शिक्षकाची आवश्यकता होती आणि ते पद ईश्वरचंद्र विद्यासागर यांना देऊ करण्यात आले. त्यावेळी ते महिन्याला पन्नास रूपये कमवत होते आणि ह्या नव्या पदामुळे त्यांना नव्वद रूपये मिळू शकणार होते. पण त्यांनी विचार केला की त्यांचे मित्र तारक वाचस्पती हे त्यांच्यापेक्षा अधिक चांगले व्याकरणाचे शिक्षक आहेत आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे असे ठरविण्यात आले की,  त्यांच्या मित्राने ते पद स्वीकारावे. विद्यासागर खूप समाधानी झाले. कलकत्यापासून काही अंतरावर राहणाऱ्या या मित्राला शोधायला ते स्वतः चालत गेले आणि त्यांनी त्याला ही बातमी दिली. अशा विद्वान व्यक्तीच्या विनयशीलतेमुळे तारकवाचस्पती थक्क झाले आणि म्हणाले, “विद्यासागर, तुम्ही माणूस नाही तर साक्षात मानवी देहातील ईश्वरच आहात!”

तात्पर्य

[संपादन]

गुणवान व्यक्तीलाच दुसऱ्या गुणवान व्यक्तीची जाण असते हेच या कथेमधून लक्षात येते. [१]

अधिक माहितीसाठी

[संपादन]

ईश्वर चंद्र विद्यासागर (इंग्रजी)

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.