Jump to content

परझानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
परझानिया
चलचित्र
शीर्षकParzania संपादन
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख2005 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाइंग्लिश भाषा संपादन
दिग्दर्शकराहुल ढोलकिया संपादन
पटकथाDavid N. Donihue संपादन
प्रमुख कलाकारनसिरुद्दीन शाह, सारिका, Corin Nemec, Rajendranath Zutshi, Parzan Dastur संपादन
संगीतकारझाकिर हुसेन (तबलावादक) संपादन
वितरकPVR Inox Pictures संपादन
Narrative locationभारत संपादन
रंगcolor संपादन

परझानिया हा २००७ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे जो राहुल ढोलकिया यांनी सह-लेखन आणि दिग्दर्शित केला आहे; डेव्हिड एन. डोनिह्यू हे दुसरे सह-लेखक आहेत. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि सारिका यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या, तर कोरिन नेमेक आणि राज झुत्शी यांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या. ७००,००० अमेरिकन डॉलर्सच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये चित्रित करण्यात आला होता.[]

हा चित्रपट दहा वर्षांच्या पारशी मुलागा अझहर मोदीच्या सत्य कथेवर आधारित आहे. चित्रपटात ह्या मुलाचे नाव परजान पिठावाला आहे जो २८ फेब्रुवारी २००२ रोजी गुलबर्ग सोसायटी हत्याकांडानंतर गायब होतो, ज्यामध्ये ६९ लोक मारले गेले होते आणि २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींमधील अनेक घटनांपैकी ही एक घटना होती.[] हा चित्रपट पिठावाला कुटुंबाचा त्यांच्या हरवलेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न करतानाचा प्रवास दाखवतो.

२६ नोव्हेंबर २००५ रोजी गोव्यात झालेल्या ३६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि २६ जानेवारी २००७ रोजी देशभरात प्रदर्शित झाला.[]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी विजेता निकाल
२००७ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[] सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन राहुल ढोलकिया विजयी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सारिका विजयी
२००८ फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्तम कथा डेव्हिड एन डोनिह्यू, राहुल ढोलकिया नामांकन
सर्वोत्तम पटकथा नामांकन
स्क्रीन पुरस्कार रामनाथ गोएंका स्मृती पुरस्कार राहुल ढोलकिया विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. "Heaven & Hell On Earth - Overview". Allmovie. 22 February 2009 रोजी पाहिले.
  2. "Apex court SIT submits report on Gulbarg Society massacre". The Hindustan Times. 14 May 2010. 6 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. Kamath, Sudhish (3 December 2005). "Turnout spells success for IFFI". द हिंदू. 5 March 2006 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2009 रोजी पाहिले.
  4. "53rd National Film Awards – 2006". Directorate of Film Festivals. p. 30. 15 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 December 2012 रोजी पाहिले.