पद्मा यांगचान
पद्मा यांगचान या लडाखमधील एक भारतीय उद्योजिका आहेत. त्यांनी वस्त्र परिकल्पक (फॅशन डिझायनर) म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. त्या 'नामझा कुटूर' (Namza Couture) आणि 'नामझा डायनिंग' (Namza Dining) च्या मालक आहेत. लडाखची स्थानिक कला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 'नारी शक्ती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.
कारकिर्द
[संपादन]यांगचन यांचा जन्म साधारण १९९१ मध्ये उत्तर भारतातील लडाख येथे झाला. त्यांनी आपले पदवीचे शिक्षण लेडी श्री राम कॉलेजमधून पूर्ण केले, तर फॅशन डिझाइनिंगचा अभ्यासक्रम दिल्ली आणि लंडन येथून पूर्ण केला.[१][२] लडाखला परतण्यापूर्वी त्यांनी दिल्ली, लंडन आणि मुंबईतील नामांकित मासिकांसोबत काम केले.[१]
२०१६ मध्ये, त्यांनी त्यांचे व्यावसायिक भागीदार जिग्मेट डिस्केट यांच्यासह 'नामझा कुटूर' ही कपड्यांची कंपनी स्थापन केली. ही कंपनी हाताने तयार केलेले जॅकेट्स आणि केप्स बनवण्यासाठी पश्मिना, मेंढीची लोकर (लडाखी भाषेत: नंबू), याकची लोकर (खुलू) आणि उंटाची लोकर यांसारख्या स्थानिक कापडांचा वापर करते.[३][१] त्यांच्या भागीदार डिस्केट या कांदा, सूर्यफूल आणि गुलाबाचा वापर करून स्वतःचे नैसर्गिक रंग तयार करतात.[४]

२०१९ मध्ये लंडन फॅशन वीक मध्ये या कपड्यांच्या श्रेणीचे प्रदर्शन करण्यात आले होते.[५] लेहमध्ये 'नामझा'चे एक स्टोअर आहे जे उच्च दर्जाचे फॅशन कपडे (high-end couture) विकते; तसेच तिथे लडाखी संस्कृती, परंपरा आणि लडाखच्या लुप्त होत चाललेल्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येतो.[५][२] त्यांच्या या यशाची दखल घेऊन, २०२२ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना 'नारी शक्ती पुरस्कार' प्रदान करण्यात आला.[६]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 Dar, Vaishali (9 January 2022). "Head over hills: Home-grown brands setting shop in mountains". Financial Express (इंग्रजी भाषेत). 27 April 2022 रोजी पाहिले.
- 1 2 Amin, Muntaha (27 July 2019). "In women-friendly Leh, this young designer is reviving lost cuisine and clothing". Free Press Kashmir. 27 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ Yadav, Medha Dutta (4 April 2021). "Pride and patrimony". The New Indian Express. 27 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ Singh, Pooja (8 May 2021). "Ladakhis want to reclaim pashmina. But can they?". Mintlounge (इंग्रजी भाषेत). 2022-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 April 2022 रोजी पाहिले.
- 1 2 Peterson, Lucas (15 November 2018). "Cups of Tea, Pashminas and Momos, Seeing India's Himalayas on a Budget". The New York Times. 27 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ Kainthola, Deepanshu (8 March 2022). "President Presents Nari Shakti Puraskar for the Years 2020, 2021". Tatsat Chronicle Magazine (इंग्रजी भाषेत). 27 April 2022 रोजी पाहिले.