पद्माकर शिवलकर
Indian cricketer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १४, इ.स. १९४० | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ३, इ.स. २०२५ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
पद्माकर काशिनाथ शिवलकर (१४ सप्टेंबर, १९४० - ३ मार्च, २०२५) हे भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू होते.[१] त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९४० रोजी झाला. डावखुरा पारंपरिक गोलंदाज म्हणून शिवलकर २० वर्षांहून अधिक काळ बॉम्बे क्रिकेटसंघाकडून खेळले. विशेष म्हणजे, शिवलकर हे संघाचे आतापर्यंतचे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून ओळखले जातात. निवृत्त झाल्यावर ते जवळजवळ ५० वर्षांचे होते. २०१६ मध्ये, त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बीसीसीआय कडून माजी खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.[२]
दुर्दैवाने शिवलकर यांची भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही, परंतु त्यांची कारकीर्द बिशनसिंग बेदी यांच्या कारकिर्दीशी जुळली.[३] १९७३-७४ मध्ये त्यांनी भारतीय संघासह श्रीलंकेचा दौरा केला, श्रीलंका क्रिकेटसंघा विरुद्ध दोन्ही सामन्यात ते खेळले आणि त्यांनी चार बळी घेतले.
१९७२-७३ मध्ये रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात त्यांनी तामिळनाडू क्रिकेट संघाविरुद्ध मुंबई क्रिकेट संघाकडून १६ धावांत ८ आणि १८ धावांत ५ बळी घेतले. ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती. यापूर्वीच्या हंगामाच्या उपांत्य फेरीत त्यांनी म्हैसूर क्रिकेट संघाविरुद्ध १९ धावांत ८ आणि ३१ धावांत ५ बळी घेतले होते.
पद्माकर शिवलकर यांचे ३ मार्च, २०२५ रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Jawali, Madhu (26 April 2020). "Padmakar Shivalkar remains content". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 6 December 2022 रोजी पाहिले.
- ^ Sarmah, Bhargab (27 February 2017). "Rajinder Goel, Padmakar Shivalkar to Receive Col. CK Nayudu Lifetime Achievement Award". NDTV (इंग्रजी भाषेत). 25 April 2023 रोजी पाहिले.
- ^ "Loads of pluck, not much luck for Padmakar Shivalkar". 16 March 2013 रोजी पाहिले.
- ^ https://sportstar.thehindu.com/cricket/padmakar-shivalkar-passes-away-aged-84-mumbai-cricketer-ranji-trophy-career-stats/article69286606.ece